तोफखान्याच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून ‘कलेक्टर’ देतो, अवैधधंद्यांना परवानग्या ; वसुलीसाठी चक्क खासगी वसुलीधार !

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर- तोफखाना वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पोलिसदादा (कलेक्टर) देत आहे, अवैधधंद्यांवाल्यांना परवानग्या. या अवैधधंदेवाल्यांच्या वसुलीसाठी ‘कलेक्टर’ पोलीस  दादाने आता चक्क खाजगी वसुलीधार ‘भैय्या’ नावाचा मुलगा ठेवला असल्याचे बोलले जात आहे. या बेलगाम कलेक्टर दादाने परवानग्या दिल्याने तोफखाना हद्दीत मोठ्या प्रमाणात जुगार, बिंगो, प्लॉश टेबल सारख्या अवैधधंद्यांना मोठे उधाण आले आहे. हे केवळ  पोलीस दादा ‘कलेक्टर’ हा वरिष्ठांची दिशाभूल करीत असल्याने घडत आहे. यामुळेच तोफखाना वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
अहमदनगर तोफखाना ठाणे हद्दीत अवैधधंद्यांना उधाण आले आहे, हे केवळ तोफखान्याच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून कलेक्शन करणारा ‘कलेक्टर’ दादा देत आहे, अवैधधंद्यांना परवानग्यामुळेच झाले आहे.  या तोफखान्याच्या कलेक्टरने तर कहरच केला असून,  चक्क अवैधधंदेवाल्यांकडून हप्ते वसुलीसाठी खाजगी पगारी वसुली कामगार भैय्या नावाच्या मुलाला नेमले आहे. या सुसाट सुटलेल्या बेलगाम पोलीस दादा (कलेक्टर) ला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वेळीच लगाम लावावा, अन्यथा हा ‘पोलीस दादा कलेक्टर’ हा तोफखाना वरिष्ठांसह जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनाही अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांचे वर्तन एकंदरीत दिसून येत आहे. तोफखान्याचा पोलीस दादा कलेक्टर हा सुसाट सुटला आहे. या कलेक्टरने वरिष्ठांना अंधारात ठेवून तोफखान्याच्या हाकेच्या अंतरावर म्हणजेच सिव्हिल हडको येथे तिरट (फ्लॅश टेबल) नावाच्या अवैधधंद्याला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यावर धंदेवाल्याकडून कलेक्टर दादा हा महिन्याकाठी मोठी वसुली करतो.  या कलेक्टर दादामुळेच  तोफखाना हद्दीत भिस्तबागचौक, पवननगर, बोल्हेगाव, गांधीनगर, यशोदानगर भाजीमार्केटजवळ जुगार, बिंगो टेबल तसेच बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी यासह अन्य अवैधधंदे जोरात सुरू आहेत. या अवैधधंद्यातूनच यापूर्वी खून झाल्याच्या घटना घडल्या असून, काही दिवसांपूर्वी येथील जुगार अड्डयावर एका मुलाला मारहाण झाली होती, याबाबत संबंधितांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. यामुळेच तोफखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बेलगाम सुटलेल्या पोलीसदादा ‘कलेक्टर’कडे चांगलेच लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, अन्यथा तोफखाना वरिष्ठांसह जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनाही तो अडचणीत आणू शकतो. पाहुया आता या तोफखाना ‘पोलिस दादा कलेक्टर’ वर वरिष्ठ काय कार्यवाही करतात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!