संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील भवानीनगर येथे ‘काव्याज् हेल्थ ऑईल’ लाकडी तेल घाण्याचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गजें यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी आयपीएस विक्रम बोके, राहाता साधन केंद्राच्या सौ. राजेश्री डांगे, मंडल कृषी अधिकारी धनंजय वार्डेकर, आयसीआयसी बॅंक सेल्स मॅनेजर राजेंद्र खांडे, मुंबई बीएमसीसी सुप्रीटेन्डेन्ट अविनाश गायकवाड, डॉ. अंकुश शिल्लारे (नाशिक), काव्याज् हेल्थ ऑईलच्या संचालिका सौ. कविता गायकवाड, उद्योजक सिद्धार्थ मोकळ, जयेशभाऊ कांबळे (सा.का.माही जळगाव), प्रविण दा. गायकवाड (सा.का.किवळे पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.




