5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जि. प.अहमदनगर आरोग्य विभागास प्रदान



👉सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत आंतरराष्ट्रीय संस्थेकडून
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर - सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत 5 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा परिषद अहमदनगर मधील आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. एका कॉन्सन्ट्रेटरची किंमत सव्वा लाख रुपये आहे.
   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक हरिश वैदय प्रकल्प समन्वयक गणेश ताठे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थित ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जिल्हा परिषदेला सुपूर्द करण्यात आले.
     अहमदनगर जिल्हा परिषदेला 5 आणि राहुरी येथे 5 असे एकूण 10 कॉन्सन्ट्रेटर आज वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेतऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर संदीप काळे आणि अर्जुन दळवी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
सेव्ह द चिल्ड्रन ही संस्था भारतामध्ये एकुण 19 राज्यात बालकांच्या हक्क आणि अधिकारावर आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. कोविड 19 परिस्थितीमध्ये भारत देशामधील परिस्थितीत सुधारणा व्हावी. भारतीय नागरिकांचे जनतेची कोरोना महामारीतुन सुटका व्हावी. तसेच देशाच्या आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण कमी होणे कामी संस्थेमार्फत देशातील विविध ठिकाणी यांत्रिक उपकरणे वाटपाचे कार्य हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सेव्ह द चिल्ड्रन संस्थेमार्फत बेंगलोर मधून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागविण्यात आले होते आणि ते सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मुंबई आणि पुणे विमानतळावरून देशातील विविध राज्यात  39 शहरात पोहविण्यासाठी संस्थेने काम केल आहेे.  हे सर्व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऑस्ट्रेलिया तसेच बेंगलोर वरून भारतात आणण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्या सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत या संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ व्यवस्थापिका शिरीन मॅथ्यूव्ह तसेच सहाय्यक व्यवस्थापिका अपर्णा जोशी, वाणिज्य समन्वयक मनोज गोयल आणि प्रशासन समन्वयक आरिफ हमाल यांचे सहकार्य लाभले. अहमदनगर जिल्ह्यात संस्थेचे बालकांशी संबंधीत विविध प्रकल्प चालू आहेत.
    सेव्ह द चिल्ड्रन - बाल रक्षा भारत या संस्थेचे  उपसंचालक संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चालु आहे. हे सर्व कार्य संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन सूची आणि उपसंचालक संजय शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य चालु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!