पारंपारिक सण आदर्श व्यक्ती घडवतात – सुहास चव्हाण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – दैनंदिन जीवन जगत असताना विपरीत परिस्थितीमुळे मानवाच्या हातून चुका होतात कायद्याने चुका सुधारण्यासाठी,व झालेल्या चुकांची शिक्षा देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली आहे,आपल्या परंपरा,सण मानवी चुकांना सुधारण्याचा व आदर्श जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. व्यक्ती जाणीवपूर्वक गुन्हा करत नाही तसेच कायदा देखील आरोपींना एक वेळ चुका सुधारण्याची संधी देत असतो त्यामुळे प्रत्येक आरोपीला बंदिवासात असताना देखील पारंपारिक सण साजरे करण्याचा हक्क आरोपींना आहे. पोलिस व आरोपी यामधील सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहावे यासाठी रक्षाबंधन हा कार्यक्रम साजरा करत आहोत असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी केले.
रक्षाबंधन सणानिमित्त पाथर्डी पोलीस ठाण्यात बंदिवासात असलेल्या आरोपींना पोलीस भगिनींच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण हे बोलत होते. यावेळी जेलमध्ये असून देखील पोलिसांनी बहीण-भावाच्या नात्याची पावित्र जपत राखी बांधून पुढील कालावधीत समाजामध्ये सुधारण्याचा व सामाजिक जबाबदारीने वागण्याची शपथ या वेळी आरोपींनी घेतली. या उपक्रमात पाथर्डी पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, सपोनि कौशल्य वाघ, महिला पोलीस शिपाई प्रतिभा नागरे, महिला पोलीस शिपाई प्रियंका निजवे, पोलीस हवलदार हरिभाऊ दळवी, पोलीस शिपाई सागर मोहिते,एकनाथ गर्कल, पोलीस चालक राजेंद्र सूद्रुक,पोलीस नाईक आजिनाथ बडे, पोलीस चालक संजय बडे आदी सहभागी झाले होते.



