शेवगांव, पाथर्डीत मावा, सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर ‘नगर क्राईम ब्रॅंच’ची छापेमारी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : शेवगांव व पाथर्डी येथे मावा व सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर शुक्रवारी (दि.१२ सप्टेंबर २०२५) अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने छापे टाकले. या छाप्यात ४ आरोपींकडून २ लाख ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार अतुल लोटके, किशोर शिरसाठ, बाळासाहेब गुंजाळ, सतिष भवर आदींच्या टीमने शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये तर पोलीस अंमलदार सुरेश माळी, राहुल डोके, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, मनोज साखरे, महादेव भांड आदींच्या टीमने पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये छापे टाकले.

दोन्ही टीमने शेवगांव व पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केली आहे.
शेवगाव पोलीस ठाण्यात ८१९/२०२५ बी.एन.एस. कलम २२३,२७४,२७५ या कलमानुसार सागर श्रीराम लोखंडे (वय ३०, रा. दहिगांव, ता. शेवगांव), प्रविण यशोदास खरात, युनुस सुलतान शेख आदींना अटक करुन गुन्हा दाखल करुन १ लाख ७१ हजार ५०० रुपये किंमतीचा त्यामध्ये तयार मावा, सुगंधीत तंबाखू, मावा तयार करण्याचे मशीन जप्त केले.
पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरंजि.१०५४/२०२५
बी.एन.एस. कलम २२३, २७५ कलमानुसार अभिजीत मिनानाथ लांडे (रा. आनंदनगर, पाथर्डी, ता. पाथर्डी) यास अटक करुन ८४ हजार ५०० रुपये किमतीची सुगंधीत तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे.


