राहुरी पोलिसांची कारवाई ; नॉन बेलेबल वॉरंटमधील १५ पुरुष व ३ महिला अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
राहुरी : नॉन बेलेबल वॉरंटमधील १५ पुरुष व ३ महिला अशा एकूण १८ आरोपींना राहुरी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
राहुरी पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी राहुरी पोलिसांकडून विविध गुन्हे अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट मधील एकूण १८ पुरुष महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे याप्रमाणे: नंदिनी सिताराम गाडे (रा.जोगेश्वरी आखाडा राहुरी), कविता सिताराम खंडेश्वर (रा.जोगेश्वरी आखाडा राहुरी), वैभव कटारी (रा.वाघाचा आखाडा ता. राहुरी), राजेंद्र उर्फ राजू भाऊसाहेब देसाई (रा. राहुरी बुद्रुक), भागवत तुकाराम ठोसर् (रा.कोपरे राहुरी), सोमनाथ शंकर कुलथे (रा.वळण ता.राहुरी), संदीप दिनकर कडू (रा.देवळाली प्रवरा), अनिल तानाजी होले (रा देवळाली प्रवरा), अक्षय विजय मुसमाडे (रा देवळाली प्रवरा), अक्षय विजय मुसमाडे (रा देवळाली प्रवरा), दत्तात्रेय सोमनाथ डहाळेद (रा देवळाली प्रवरा), बापू शिरसाट (रा. ब्राह्मणी), अशोक बापूसाहेब शिरसाट (रा.ब्राह्मणी), अमोल अशोक जाधव (रा.मल्हारवाडी), जनार्दन भाऊसाहेब दळे (रा.डिग्रस), रमेश कुमार किसन कुंजीर (रा वांबोरी), अझरुद्दीन पठाण (रा.खडंबे), सुभाष नामदेव शेकडे (रा राहुरी), सुभाष नामदेव शेकडे (फॅक्टरी), विठ्ठल तुकाराम बर्डे (रा. राहुरी फॅक्टरी).
या सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. तसेच जामीन पात्र वॉरंटची बजावणी केली.
राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने ज्या नागरिकांचे न्यायालयात काही खटले चालू आहेत. त्यांना आवाहन करण्यात येते की आपले जर न्यायालयात काही प्रकरण चालू असल्यास समन्स निघताच न्यायालयात तारखेवर हजर राहावे, ज्यामुळे बेलेबल वॉरंट निघणार नाही. आणि चुकून बेलेबल वॉरंट निघाल्यास त्यावेळी तरी न्यायालयात हजर राहावे जेणेकरून नॉन बेलेबल वॉरंट निघून अटकेची नामुष्की आपल्यावर येणार नाही.
ही कारवाई एसपी सोमनाथ घर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डावायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव, एएसआय तुळशीदास गीते, हेपोकाॅ राहुल यादव, हनुमंत आव्हाड, सुरज गायकवाड, अशोक झीने, बाबासाहेब शेळके, अमित राठोड, विकास वैरल, संदीप ठाणगे, विजय नवले, संजय राठोड, बबन राठोड, पोना प्रवीण बागुल, गणेश सानप, सुनील निकम, पोकाॅ गणेश लिपणे आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.


