अहिल्यानगरात हिंदू – मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणा-या आरोपींना अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील सय्यद घोडपीर दर्गा तोडून हिंदु – मुस्लीम समाजाच्या भावना दुखावणा-या दोन आरोपींना अवघ्या काही तासात अहिल्यानगर पोलीसांनी जेरबंद केले आहे.
दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील देशपांडे हॉस्पीटल, पटवर्धन चौक येथी हिंदू व मुस्लीम समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या धार्मिकस्थळ सय्यद घोडेपीर दर्गाचे अज्ञात काहींनी तोडफोड करुन नुकसान करुन हिंदू व मुस्लीम धर्माचा अपमान करुन समस्त हिंदू- मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भानवा दुखावन्याचा प्रयत्न केला. दंगल घडून आणण्याचे उद्देशाने कृत्य केले आहे. याबाबत वसिम रौफ खान (रा. पटवर्धन चौक, आनंदी बाजार, अहिल्यानगर) यांच्या तक्रारीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गुरनं. ७६१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २९८, २९९, ३२४(४),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
एसपी सोमनाथ घार्गे यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच , कोतवाली, तोफखाना पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची स्वतंत्र टीम तयार करुन आरोपीचे शोध घेणे कामी सूचना दिल्या.
त्याप्रमाणे तपासी टीमने अहिल्यानगर शहरातील घटने ठिकाणाच्या व परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करुन घटनेत वापरलेला जेसीबीचा शोधला असता, जेसीबी मिळून आल्याने, जेसीबी मालक अरुण गोविंद खरात (रा.समता चौक, सावेडी,अहिल्यानगर) यांना अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कार्यालयात बोलावून त्यांच्याकडे जेसीबी चालकाबाबत विचारपुस करता त्यांनी तो जेसीबी बबलु पाल (रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर) याच्या ताब्यात असल्याचे सांगितले. त्या आधारे जेसीबी चालक बबलु पाल याचा व्यवसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेतला असता तो बोरुडेमळा (भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर) येथे मिळून आल्याने त्यास गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यास विश्वासात घेऊन इतर साथीदाराबाबत विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार योगेश झोंड (रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर), सचिन दारकुंडे (रा.समतानगर, सावेडी, ता.जि.अहिल्यानगर), दत्ता गायकवाड, (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) व इतर तीन ते चार जणांनी मिळून केला असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर इतर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी योगेश सखाराम झोंड (रा. धोंडेवाडी रोड, वाळकी, ता.जि.अहिल्यानगर हल्ली रा. बोरुडे मळा, भुतकरवाडी, ता.जि. अहिल्यानगर) हा बोरुडे मळा (अहिल्यानगर) येथे मिळुन आला आहे. दोन्ही आरोपींना, तसेच जेसीबी मालक अरुण गोविंद खरात (रा.समता चौक, सावेडी, अहिल्यानगर) यांना दाखल गुन्ह्याच्या पुढीत तपासकामी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. जेसीबी मालक अरुण गोविंद खरात यास गुन्ह्याच्या चौकशी कामी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
कारवाई एसपी सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर शहर डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच , कोतवाली व तोफखाना पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त कारवाई केली आहे.


