अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे रविवारी सायक्लोथॉन स्पर्धा

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे रविवारी सायक्लोथॉन स्पर्धा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत रविवारी दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे सायक्लोथॉन स्पर्धा घेण्यात येत आहे.उपक्रमाचा हेतू पोलीस दल व नागरिकांमध्ये “फिटनेस की डोस आधा घंटा रोज ” या संदेशाचा प्रसार करणे व फिटनेसला दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनविणे हा आहे, अशी माहिती अहिल्यानगर एसपी सोमनाथ घार्गे यांनी दिली.


  • भारत सरकार क्रिडा विभागाच्या निर्देशानुसार “फिट इंडिया” मोहिमे अंतर्गत दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे सायक्लोथॉन स्पर्धा ही डिएसपी चौक – एसबीआय चौक- पुणे बस स्टॅण्ड -सक्कर चौक न्यू टिळक रोड- नेप्ती नाका -दिल्ली गेट-बालिकाश्रम रोड- नायरा पेट्रोलपंप -प्रेमदान चौक – पत्रकार चौक – तारकपूर – डीएसपी चौक अशी १५ कि.मी. गटामध्ये घेण्यात येणार आहे.
    सर्व सायकलपटू यांनी ज्यांना सायक्लोथॉनमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६.३० वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, डिएसपी चौक छत्रपती संभाजी नगर रोड, अहिल्यानगर या ठिकाणी स्वतःची सायकल, हेल्मेट व योग्य त्या साहित्यासह हजर राहावेत. सायक्लोथॉन मध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धेकांना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धेकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अहिल्यानगर एसपी सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!