भाजपा अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याच्या जाहीर कार्यकारिणीवर हरकत घेत, प्रदेशाध्यक्षाकडे तक्रार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
Ahilyanagar
अहिल्यानगर दक्षिणेची भाजपाची नुकतीच जिल्ह्यातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, परंतु या कारणीबाबत जुन्या पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकत्यांनी या झालेल्या निवडीस हरकत घेत, याबाबत थेट महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून, ही निवड कार्यकारणी बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे व मेल द्वारे प्रा. सुनील मोहनराव पाखरे, नागनाथ भारतराव गर्जे (राजे), युसुफ उस्मानगणी शेख यांनी केली आहे.
निवेदन म्हटले आहे की, अहिल्यानगर दक्षिण विभागातील भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंतची ७ पानी अहवालाची प्रत प्रत्यक्ष भेटून सादर करत आहोत. यामध्ये भारतीय जनता पार्टीची जुने जाणते, पक्षनिष्ठ व पक्षाची विचारधारा जोपासणा-या कार्यकर्त्याचा अहवाल लिखित स्वरुपात तयार केला. मागील दशकापासून भा.ज.पा. च्या पदरात आलेले विविध राजकीय पक्षातून पतन झालेले व राजकीय मृत्यू झाल्यानंतर भा.ज.प.च्या आश्रयाला आलेले अतिक्रमणित आलेले लोक हे पक्षाच्या कुठल्याही विचारधारेशी निष्ठावान नसून त्यांची या कार्यकारणीत वर्णी लागली आहे. दुसरी बाजू अशी कि, भाजपासाठी ज्या कार्यकर्त्यांनी ३० ते ४० वर्षापासून आपले आयुष्य व तारुण्य प्रणाला लावले अश्या पक्षाच्या सच्चा व निष्ठावान कार्यकर्त्याला केवळ राजकीय व सामाजिक द्वेषापोटी त्यांना या पक्ष कार्याकारणीतून अलगद बाजूला ठेवले आहे. ही गठीत झालेली कार्यकारणी सच्चा व निष्ठावान आणि पक्षाच्या लढावू कार्यकर्त्याची कार्यकारणी नसून केवळ जातीवादी, विषारी मानसिकतेतून अत्यंत गलिच्छ राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या लाचार कार्यकर्त्याची ही फळी आहे. त्यामुळे जिल्हा कार्यकारणी ही फर्जी असून पक्षाची प्रतिष्ठा व सन्मान जपण्यासाठी या कार्यकारणीवर प्रदेश भाजपाचे संघटनात्मक प्रमुख म्हणून आपण स्वतः लक्ष घालून या कार्यकरणीची शुद्धीकरण करण्यात यावे. पक्षाच्या सच्चा व निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यात यावा. भाजपा हा घटनेवर आधारित असून त्यानुसार निर्णय राबविले जातात. ज्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे ध्येय्, धोरणे, विचारधारा व तत्वप्रणाली जोपासण्यासाठी वेळ, श्रम, बुद्धी, पैसा, व कौशल्य हे पंचदान अर्पण करून स्वतःचे आयुष्य व भविष्य पार्टीला समर्पित केले आहे. त्यांच्यावर अन्याय झाल्यास छ. संभाजीनगर उच्च न्यायालयात जलदगतीने आहवान दिले जाईन, असा इशारा निवेदनात दिला आहे. याबाबत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नवी दिल्ली, यांनाही कळविण्यात आले आहे.


