स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांच्या सहकारातील योगदानातून प्रेरणा मिळते : मा. उपसभापती बाळासाहेब जपे पा.

स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांच्या सहकारातील योगदानातून प्रेरणा मिळते : मा. उपसभापती बाळासाहेब जपे पा.
सावळविहीर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने स्व.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. यांची १२५ वी जयंती उत्सव व शेतकरी दिनानिमित्ताने कार्यक्रम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
शिर्डी : स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांच्या सहकारातील योगदानातून प्रेरणा मिळते. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्राम विकासाचे धडे दिले आहेत. त्यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ नेते स्व.बाळासाहेब विखे पा. यांनी तो विकासाचा रथ पुढे नेला. त्याच दिशेने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. मा.खा.सुजयदादा विखे पा.‌ या नेत्यांचीही आजपर्यंत वाटचाल सुरू आहे. दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीही जनसेवा करीत असल्याचे प्रतिपादन माजी उपसभापती बाळासाहेब जपे पा. यांनी केले.
राहाता तालुक्यातील सावळविहीर बु. ग्रामपंचायतीच्या वतीने स्व.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. यांची १२५ वी जयंती उत्सव व शेतकरी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावळविहीरचे सरपंच ओमेश जपे पा, मा. सरपंच अशोक आगलावे पा , उपसरपंच विकास जपे पा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब जपे पा. पुढे म्हणाले की, स्व. पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांनी सहकार कारखानदारीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थेसह गोरगरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे आज ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहोचलेली आहे. त्याचे श्रेय स्वर्गीय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व स्वं लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना जाते. त्याच्या कामाची प्रेरणा घेऊन आज पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे व मा.खा. डॉ सुजय विखे पा. हेही अविरत विकासासाठी काम करत आहेत.
संरपच ओमेश जपे पा.म्हणाले की, सहकार ग्रामविकास व शैक्षणिक विकासाच्या माध्यमातून पद्मश्री विठ्ठलराव विखे पा व लोकनेते पद्मश्री बाळासाहेब विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली विखे पा. परिवाराने सहकारात मोठे काम करत आहेत. सत्तेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकास आज समाजासमोर आहे. पद्मश्री विखे पा. हे नेहमीच समाजासाठी प्रेरणास्थान राहिलेले आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी ज्येष्ठ नेते जिजाबा आगलावे पा , शांताराम जपे पा. , किरण शिंदे, कैलासराव सदाफळ, विठ्ठलराव मातेरे पा , गणेश कापसे पा, सुनील जपे पा., ग्रामपंचायत सदस्य संजय जपे पा. , आशिष आगलावे पा ,आनंद जपे पा , सागर आरणे, विठ्ठलराव कापसे पा. , मारुती कापसे पा. , रामदास आगलावे पा., राहुल आगलावे पा., संजय आगलावे पा., दगडू कापसे पा, किरण आगलावे पा, संदीप जपे पा., सतीश जपे पा., सर्जेराव जपे पा, बाळासाहेब सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!