अहिल्यानगरात बनावट नोटांचे रॅकेट उघड – नगर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यात नगर तालुक्यात बनावट नोटा तयार करण्याचे रॅकेट उघड करण्याची मोठी कामगिरी एसपी सोमनाथ घार्गेे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषातः नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद गिते यांनी आपल्या टीमसह केली आहे. या कारवाईत एकूण 8 आरोपींना निष्पन्न केले असून, यातील एकजण फरार आहे. त्याच्याकडून 59 लाख 50 हजार रुपयांच्या 500 रुपयांच्या तयार बनावट चलनी नोटा, 2 लाख 16 हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचे कागद व शाई इत्यादी प्रकारचे साहित्य, 27 लाख 90 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, संगणकासह अन्य साहित्य असे एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें, नगर ग्रामीण डिवायएसपी अमोल भारती यांच्या सूचनानुसार विशेषातः नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद गिते यांच्यासह पोसई भरत धुमाळ, पोहेकॉ सुभाष थोरात, पोहेकॉ रविकिरण सोनटक्के, पोहेकॉ बाबासाहेब खेडकर, पोहेकॉ मंगेश खरमाळे, पोहेकॉ शरद वांडेकर, पोहेकॉ खंडू शिंदे, पोकॉ सागर मिसाळ, पोकॉ राजू खेडकर, पोकॉ विक्रांत भालसिंग, पोकॉ अदिनाथ शिरसाठ, पोकॉ अन्सार शेख, मपोहेकॉ मोहिनी कर्डक, दक्षिण विभाग मोबईल सेलचे पोकॉ नितीन शिंदे आदींच्या टीमने केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवारी दि.27 जुलै 2025 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद गिते हे नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, दोनजण एक काळ्या रंगाचे महिंद्रा थार गाडीमध्ये फिरत आहे. त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा आहेत, आणि ते आंबीलवाडी शिवारात प्रत्येक पान टपरीवर देऊन सिगारेट खरेदी करत आहेत. या मािहितीनुसार सपोनि श्री गिते यांनी त्याच्या तपासी टीममधील पोलिस कर्मचारी यांना बोलावून त्यांच्यासोबत आंबीलवाडी शिवारात जाऊन स्वतः खात्री केल्यावर तेथे दोन संशयीत एक महिंद्राथार गाडीमध्ये फिरताना दिसले. सपोनि श्री गिते यांच्यासह तपासी टीममधील पोलिस कर्मचार्‍यांनी त्या सवार्र्ंना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव निखील शिवाजी गांगर्डे (वय 27 रा. कुंभळी ता.कर्जत जि.अहिल्यानगर), सोमनाथ माणिक शिंदे (वय 25 रा.तपोवनरोड जि.अहिलयानगर) असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे सपोनि श्री गितेंनी सखोल चौकशी करुन गाडीची झडती घेतील. या दरम्यान त्याच्याकडे 80 हजार रुपयांच्या 500 रुपयांच्या बनावट चलनी नोटा मिळून आल्या. त्या सवार्र्ंना ताब्यात घेऊन त्यांच्यावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुरन.628/2025 भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 179, 180, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचे अधिक तपास करता बीड जिल्ह्यातून आरोपी प्रदिप संजय कापरे (वय 28 रा.तितरवणी ता.शिरुर कासार जि.बीड), संभाजीनगरमधून आरोपी मंगेश पंढरी शिरसाठ (वय 40 रा. शिवाजीनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर), विनोद दामोधर अरबट (वय 53 रा. सातारा परिसर ता.जि. छत्रपती संभाजीनगर), आकाश प्रकाश बनसोडे (वय 27 रा. निसर्ग कॉलनी पेठेनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर), अनिल सुधाकर पवार (वय 34 रा.56 नंबर गेट मुकुंदनगर ता.जि. छत्रपती संभाजीनगर), फरारी अंबादास रामभाऊ ससाणे (रा.शहरटाकळी ता.शेवगाव जि.अहिल्यानगर) या सर्व आरोपींची नावे तपासात नगर तालुका पोलिसांना निष्पन्न करता आली. या पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींकडून 59 लाख 50 हजार रुपयांच्या 500 रुपयांच्या तयार बनावट चलनी नोटा, 2 लाख 16 हजार रुपयांचे बनावट नोटा तयार करण्याचे कागद व शाई इत्यादी प्रकारचे साहित्य, 27 लाख 90 हजार 600 रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचे मशिन, संगणक आदींसह अन्य साहित्य असे एकूण 88 लाख 20 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात नगर तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!