
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः जबरी चोरीच्या गुन्हयातील, सांगवी पोलीस ठाणे (पुणे) येथील मोक्का गुन्हयातील फरारी आरोपी विकी पोपट भोसले (रा.कासारवाडी ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर) याला दोन कि.मी पाठलाग करुन पाथर्डी पोलिसांनी पकडून अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे विलास पुजारी यांच्या सूचनेनुसार पोउपनि संदीप ढाकणे, पोहेकॉ अभयसिंह लबडे, पोकॉ अक्षयकुमार वडते, पोकॉ कानिफनाथ गोफणे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
दि.24 जुलै 2025 रोजी रात्री 10. 40 वाजण्याचे सुमारास तिसगांव ते पाथडी जाणार्या रोडवर निवडुंगे गांवाच्या शिवारात मित्र शिवम भारत आठरे (रा.पारेवाडो ता पाथडी) असे तिसगांवकडून पाथर्डीकडे दुचाकीवर येत असतांना आरोपी विकी पोपट भोसले (रा.कासारवाडी ता.पाथर्डी), अक्षय दत्तात्रय मरकड (रा.निवडूंग ता. पाथर्डी), लखन बाबासाहेब कासार (रा.कासारवाडी ता.पाथर्डी) व एक अनोळखी अशांनी पाठीमागून एका विनानंबरचे पांढरे रंगाचे स्विप्ट गाडीतून येऊन मला व साक्षिदार यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर विकी पोपट भोसले, अक्षय दत्तात्रय मरकड़ व त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी मला व साक्षीदार अशांना लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी करुन पॅन्टच्या खिशातील 7 हजार 500 रुपये व त्याच्या गळयातील 75 हजार रुपये किंमतीची तिन तोळ्याची सोन्याची चैन बळजबरीने चोरुन घेऊन मला व साक्षिदार यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून निघून गेले, या अक्षय राजेंद्र जायभाये (रा.शिक्षक कॉलनी, पाथर्डी, जि.अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन पाथडी पोलीस ठाण्यात गुरनं. 810/2025 भा.न्या.सं.2023 च कलम 309841,309161.3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना गुन्हयातील आरोपी विकी पोपट भोसले हा गुरुवारी (दि.ं31 जुलै 2025) त्याच्या घरी कासारवाडी (ता. पाथर्डी) या ठिकाणी पाथर्डी पोलिसांनी दोन कि.मी अंतर आरोपींचा पाठलाग करुन पकडला.


