शिर्डीत जुगार अड्ड्यावर छापा, ७ अटक ; एसपी विशेष टीमची कारवाई

शिर्डीत जुगार अड्ड्यावर छापा, ७ अटक ; एसपी विशेष टीमची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
शिर्डी: येथील भिमनगर या ठिकाणी तिरट जुगारावर एसपी सोमनाथ घार्गे यांच्या विशेष तपासी टीमने छापा टाकून ७ जणांविरुद्ध अटक करुन २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिलीप रामदास मेहेत्रे (वय ५८ रा-नांदुखीं ता-राहाता), रविंद्र दत्तात्रय लांडगे (वय-३६ रा-शिवशाही हॉटेल, रेस्ट हाऊस जवळ शिर्डी ता-राहाता), विवेक अमृतलाल शर्मा (वय-४३ रा-माऊलीनगर शिर्डी ता-राहाता), फकिरचंद जोगीलाल लोढा (वय ५४ रा-पिंपळवाडी रोड, बनरस्ता शिर्डी ता-राहाता), रुपेश सुरेश पोपटे (वय-३४ रा-कालीकानगर शिर्डी ता-राहाता), मुरगन शंकर यादव (वय-३४ रा-दत्तनगर शिर्डी ता-राहाता), हरुन कंकर शेख (वय-६० रा-पुनमनगर शिर्डी ता-राहाता) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे, श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासी टीमचे पोहेकाॅ सुनिल पवार, पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेका अरविंद भिगारदिवे, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकाॅ योगेश भिंगारदिवे, पोकॉ अमोल कांबळे, पोकाॅ दिपक जाधव, पोकॉ विजय ढाकणे, पोकाॅ जालिंदर दहिफळे आदींनी ही कारवाई केली आहे.
एसपी श्री सोमनाथ घार्गे यांनी विशेष तपासी टीमला अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्या आदेशानुसार विशेष तपासी टीमने दि.३० जुलै २०२५ ला शिडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विशेष तपासी टीम पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली कि, भिमनगर शिर्डी येथे काहीजण एकत्र जमवून पैशावर हारजितीचा जुगार हा स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता तिरट जुगार खेळतात व खेळवितात, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तात्काळ शिर्डी पोलीस स्टाफ व पंचाना समक्ष बोलावून हकिकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा, असे कळविण्यात आले. त्यांनी संमती दिल्यानंतर पोलीस टीम, पंचासह कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने रवाना झाले.
माहिती ठिकाणी भिमनगर शिडी येथे घराच्या वरच्या मजल्यावर विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काहीजण मांडी घालून एक गोलाकार डावामध्ये दिसले, तसेच त्यांच्या हातात पत्ते व समोर डावामध्ये पैसे असल्याचे दिसून आले. पोलीसांना व पंचाची खात्री झाल्याने छापा टाकला असता, एकूण ७ जण मिळून आले. मिळून आलेल्यांना पोलीस असल्याचे ओळख सांगून विश्वासात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातून १३ हजार ४८० रुपये रोख रक्कम व मोबाईल, दुचाकी व जुगार साधने असा एकूण २ लाख ९३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करुन ताब्यात घेऊन मिळून आलेले ७ आरोपीविरुध्द शिर्डी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

 

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!