जामखेडात तिरट जुगार क्लबवर छापा, ९ अटक ;
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
जामखेड : येथील तिरट जुगाराचे क्लबवर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने छापा टाकून ९ जणांना ताब्यात घेतले. या छाप्यात १ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नितीन आश्रुबा रोखडे (वय ५०, रा. आष्टा, ता. आष्टी, जि. बीड), जावेद इस्माईल बागवान (वय ४४, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड), संतोष नवनाथ कदम (वय ४२, रा. कुसडगांव ता. जामखेड), नवनाथ सदाशिव जाधव (वय ३६, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड), विजय विनायक कळसकर (वय ५३, रा. तपनेश्वर रोड, जामखेड, ता. जामखेड), निलेश लक्ष्मण पेचे (वय ४०, रा. पोकळेवस्ती, जामखेड, ता. जामखेड), जयसिंग विश्वनाथ ढोके (वय ४०, रा. भुतवडा, ता. जामखेड), विठ्ठल मोहन भोसले (वय ३८, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड, ता. जामखेड), विजय गहिनीनाथ जाधव (वय ५३, रा. कर्जत रोड, जामखेड) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, ऱ्हदय घोडके, बाळासाहेब गुंजाळ, चंद्रकांत कुसळकर आदींच्या टीमने ही कारवाई केली.
दि.२८ जुलै २०२५ ला मिळालेल्या माहितीनुसार पंचासमक्ष मिळालेल्या जामखेड बश तपनेश्वर गल्ली या ठिकाणी जाऊन खात्री करता त्या ठिकाणी भिंतीचे आडोशाला काहीजण तिरट नावाचा पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळत असताना मिळून आले. जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे सांगितली.
पोलिसांनी पंचासमक्ष ताब्यातील आरोपी हे तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आल्याने त्यांची अंगझडती घेऊन त्यांचे ताब्यातून एकूण १ लाख ५९ हजार २०० रु. किं. त्यात रोख रक्कम, ८ मोबाईल फोन, १ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२७/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहे.


