४ लाखांची सुगंधीत तंबाखू व गुटख्यासह मुद्देमाल जप्त ; कोतवाली पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : सुगंधीत तंबाखु व गुटख्याची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्या कोतवाली पोलीसांनी आरोपीसह एकूण ३ लाख ९९ हजार ७१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतले आहे.
एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार मपोसई शितल मुगडे, पोसई गणेश देशमुख, गुन्हे शोध शाखेचे पोसई कृष्णकुमार सेदवाड, पोहेकॉ बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सुर्यकांत डाके, कवाष्टे, राहुल शिंदे, पोकाॅ अभय कदम, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, संदिप कव्हळे, प्रतिभा नागरे, हिना बागवान दक्षिण मोबाईल सेलचे पोकाॅ राहुल गुंडू आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२७ जुलै २०२५ ला रात्री १०.३० वा. पोनि श्री. दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलीस टीम व दोन पंच असे चारचाकी वाहनाचा शोध घेत असतांना आनंदधाम येथील मार्केटयार्ड ते आनदंऋषीजी हॉस्पीटल रोड, पॉलीटेक्नीक कॉलेज समोर ( ता.जि. अहिल्यानगर) येथे एक चारचाकी वाहन थांबविले. यावेळी वाहन चालक हा वाहन घेऊन पळून जात असतांना रात्री ११.२० वा. पकडले. या चारचाकी वाहनात एकजण दिसून आला. त्यावेळी त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शरद अर्जुन पवार, (वय ३०, रा. जाम, पोस्ट कौडगाव, ता.जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस मपोसई शितल मुगडे यांनी पोलीस टीम व दोन पंच अशांची ओळख सांगून त्यांना झडतीचा उद्देश समजावून सांगितला. चारचाकी वाहनाची व त्याची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात एकूण ३ लाख ९९ हजार ७१२ रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळला. तो सर्व मुद्देमाल मपोसई शितल मुगडे यांनी पंचासमक्ष जागीच जप्त केला. जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात आणला. याबाबत पोकाॅ सोमनाथ केकाण यांच्या फिर्यादीवरुन अहिल्यानगर कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८४/,२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३,२२३,२७४,२७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास मपोसई. शितल मुगडे या करीत आहेत.


