पाथर्डी हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा,साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त ; एसपी घार्गे विशेष टीमची कामगिरी

पाथर्डी हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा,साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त ; एसपी घार्गे विशेष टीमची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर :  पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत
माणिकदौडी गावाचे शिवारात शेतातील पत्र्याचे शेडमध्ये चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात एकूण ११ लाख ६१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन १० जणांविरुध्द अहिल्यानगर एसपी सोमनाथ घार्गे यांच्या विशेष तपासी टीमने ही कारवाई केली आहे.
असीर छोटू पठाण (वय-४०, रा. माणिक दौंडी ता. पाथर्डी ) कलीम नूर मोहम्मद शेख (वय ५१, रा. कोरडगाव, ता. पाथर्डी, गणेश विष्णू पवळे (वय ४२, रा. पाथर्डी ता. पाथर्डी), सोमनाथ रावसाहेब चितळे (वय ३८, रा. चितळवाडी ता. पाथर्डी), फिरोज इम्रान पठाण (वय ४२, रा. पाथर्डी ता. पाथर्डी), जुबेर अफसर अली सय्यद (वय ३०, रा. माणिकदौडी ता. पाथर्डी), अशोक भगवान दहिफळे (वय ४३, रा. मोहटा ता. पाथर्डी), शाकीर उस्मान पठाण (वय-४८ रा. मानोर ता. शिरूर जि. बीड), सलमान कलीम शेख (वय २६, रा.कोरडगाव ता. पाथर्डी), अंबादास बन्सी चितळे (वय ४०, रा. चितळवाडी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर अपर. पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसपी श्री घार्गे यांचे विशेष टीमचे पोसई योगेश चाहेर, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ दिगंबर कारखेले, पोहेकॉ मल्लिकार्जुन बनकर, पोहेकाॅ अजय साठे, पोहेकॉ सुनिल पवार, पोहेकॉ उमेश खेडकर, पोहेकॉ अरविंद भिंगारदिवे, पोहेकॉ दिनेश मोरे, पोकाॅ सुनिल दिघे, पोकाॅ अमोल कांबळे, पोकाॅ संभाजी बोराडे, पोकाॅ विजय ढाकणे, पोकाॅ दिपक जाधव, पोकाॅ जालिंदर दहिफळे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी, एसपी सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार विशेष तपासी टीम ही दि.२४ जुलै २०२५ रोजी पाथडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विशेष पोलीस टीमसह पेट्रोलींग करुन अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली, त्यानुसार माहिती ठिकाणी आसिर छोटू पठाण याच्या माणिकदौंडी गावाच्या शिवारात शेतातील पत्र्याचे शेडमध्ये विशेष तपासी टीमने जाऊन खात्री केली असता तेथे काहीजण मांडी घालून दोन गोलाकार डावांमध्ये बसलेले दिसले. त्यांच्या हातात पत्ते व समोर डावा मध्ये पैसे असल्याचे दिसून आले. पोलीस टीमची व पंचांची खात्री झाल्याने छापा टाकला. पोलीसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी असलेले सर्व पळून जाऊ लागले, त्यांना पोलीस टीमने पाठलाग करुन १० जणांना ताब्यात घेतले. मिळून आलेल्यांना पोलीस असल्याचे ओळख सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली. त्यांच्या ताब्यातून ४६ हजार ५०० रुपये रोख रक्कम व ६५ हजार रुपये किंमतीचे ७ मोबाईल फोन तसेच १० लाख ५० हजार रुपये किमतीचे लहान-मोठे ६ वाहने असा एकूण १९ लाख ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. तो सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करुन ताब्यात घेऊन मिळून आलेले १० आरोपीसह पाथडी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईसाठी घेऊन आले. पाथडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८०८/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे. गुन्हा दाखल केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!