
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर शहरातील भाजपाच्या नगरसेवकांनी पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये अहिल्यानगर शहरातील विविध प्रलंबित असलेल्या नागरी समस्या व निधी यावर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका आयुक्त व संबंधित अधिकारी यांना लगेच सुचनादेऊन प्रलंबित असलेले शहरातील कामे करण्याचे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले.
यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे,निखिल वारे, धनंजय जाधव, मनोज ताठे, संजय ढोणे, उदय कराळे, रामदास आंधळे, अनिल बोरुडे, दत्ता गाडळकर, मनोज दुल्लम, अजय चितळे, सतिश शिंदे,पल्लवी जाधव यांच्या सह भाजप नगरसेवक उपस्थित होते. प्रस्तावित माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले मनोगत धनंजय जाधव, निखिल वारे, मनोज ताठे यांनी केले.


