माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन

माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अहिल्यानगरच्या राजकारणात, समाजसेवेत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. अरुणकाकांच्या निधनाच्या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अरुणकाका जगताप यांचं पार्थिव राहत्या घरी सारसनगर येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. अरुणकाका जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले, भानुदासजी कोतकर यांचे ते व्याही होते. अरुणकाका जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरु झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुणकाका जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. काकांच्या निधनाच्या वृत्ताने नगरकरांवर शोककळा पसरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!