राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी रोहन शेलार यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी रोहन शेलार यांची निवड
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष पदी रोहन रमेश शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मुंबई पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
श्री शेलार यांची निवड झाल्याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा तथा अध्यक्ष शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, अहमदनगर जिल्हाध्यक्ष फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, श्री कांबळे सर, माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ.अनिल आठरे, श्री पोटे आदिंसह नगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व संघर्ष युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!