नगर उड्डाणपुलावरून एशियर टेम्पो खाली पडला ; चांदणी चौकातील घटना, एक ठार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : शहरातील उड्डाणपूलावरुन मालवाहतूक एशियर टेम्पो चांदणी चौकात बुधवारी (दि.२४ जुलै २०२४) दुपारच्या वेळे खाली पडल्याची घटना घडली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला, एक जखमी झाले असून, घनास्थळाच्या नजिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ धाव घेतली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, औरंगाबादहून मालवाहतूक एशियर टेम्पो हा ‘पाणीपाईपचे एलबो’सह अन्य जड वस्तू पुण्याच्या दिशेने नगर शहरातील उड्डाणपूलावरुन घेऊन जात होता. या दरम्यान एशियन टेम्पो हा चांदणी चौकानजिक येताचा,ऐन उड्डाणपूलाच्या काॅर्नरला येताच एशियर टेम्पोचा जोराने झोक जाऊन टेम्पो उड्डाण पूलावरुन थेट खाली कोसळला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला. एकजण टेम्पो बाहेर बाजुला फेकले गेले होते. यामुळे मार लागून गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती नगर शहरात समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.


