पुणे डिस्ट्रिक्ट सुपर-१००० बॅडमिंटन चॅम्पिअनशिप २०२४ स्पर्धा : दुहेरी खुल्यागटात यश शाह,आर्यन शेट्टी यांनी चांदीचा फिरता करंडक पटकाविला
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणे : पुणे डिस्ट्रिक्ट मेट्रोपोलिओन बॅडमिंटन असो.च्या मान्यतेने पुणे येथे संपन्न झालेल्या योनेक्स सनराईज व जि.एच.रायसोनी मेमो.पुणे डिस्ट्रिक्ट सुपर-१००० बॅडमिंटन चॅम्पिअनशिप २०२४ या स्पर्धेत दुहेरी खुल्या गटामध्ये येथील उदयोन्मुख खेळाडू यश शाह (पुणे असो.नोंदणीकृत) व सहकारी खेळाडू आर्यन शेट्टी याच्या साथीने अंतिम सामन्यात अक्षय ससे व रोहन जाधव या खेळाडूंवर विजय मिळवत चांदीचा फिरता करंडक व रोख बक्षीस पटकाविले.
दि.२१ ते दि.२९ जूनपर्यंत मॉडर्न कॉम्प्लेक्स येथे या स्पर्धा पार पडली. यावेळी गटात सुमारे ५०० खेळाडूंचा सहभाग होता.पुणे बॅडमिंटन असो.च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यश हा सध्या एम बी.ए.चे शिक्षण घेत असून गेल्या चार वर्षांपासून बॅडमिंटनचे गुरु चैतन्य नाईक यांच्याकडे सराव करत आहे व फिटनेसचे धडे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कोच मिहीर तेहरणीकर यांच्याकडे घेत आहे.या अगोदर राज्याचे १७ व् १९ वयोगटाचे एकेरी व दुहेरीचे विजेते पद यशने पटकाविले असून महाराष्ट्राच्या टीमकडून प्रतिनिधित्व केले आहे . खेलो इंडिया,वेस्ट झोन अश्या राष्ट्रीय,तसेच मालदिव बंगलोर,व्हिएतनाम येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी यशची निवड झाली होती. या ही स्पर्धेमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत सहभागी होऊन यशने प्राविण्य मिळवले होते.बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या मानांकन यादीत यशचे १०१९ असे सध्या स्थान आहे. त्याच्या या यशाबद्धल त्याचे वाडिया पार्क बॅडमिंटन मॉर्निंग व इव्हनिंग ग्रुप व सर्वच स्थरातून अभिनंदन होत आहे.


