भिंगार पोलिसांनी केली फेरीतून कायद्यातील नवीन बदलाची जनजागृती

भिंगार पोलिसांनी केली फेरीतून कायद्यातील नवीन बदलाची जनजागृती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
भिंगार : कॅम्प पोलिसांनी कायद्यातील नवीन बदल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शालीय विद्यार्थी, सामाजिक संघटना व नागरिकांना सोबत घेऊन भिंगार शहरातून फेरी काढून जनजागृती मोहीम काढून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली.


देशात‌‌ नव्याने दि.१ जुलै २०२४ रोजी पासून नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यासाठी सर्वसामान्य जनतेस माहितीसाठी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरु यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी भिंगार मुख्य बाजारपेठेतील कॅन्टोनमेंट शाळा- भिंगार वेस-ब्राम्हणगल्ली-नेहरु चौक-बेरड गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदरबाजार-पोलीस स्टेशन या मार्गावरुन जनजागृती फेरी काढण्यात आली होती. या फेरीमध्ये कॅन्टोनमेंट शाळेचे शिक्षक संजय शिंदे सर, उदध्व शिंदे, पोउनि अतुल बोरडे, गोपनिय शाखेचे अजय गव्हाणे व अंमलदार उपस्थित होते. फेरी दरम्यान नागरिकांना फलकाद्वारे व प्रत्यक्षात माहिती देऊन कायद्यातील बदल नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम भिंगार कॅम्प पोलिसांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!