पाथर्डी परिसरात रस्तालूटीत चौघे अटक ; नगर एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी परिसरात रस्तालूट करणाऱ्या चौघांना पकडून १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई नगर एलसीबी टिम’ने केली आहे. अक्षय अशोक डमाळे (वय २०, हल्ली रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी मुळ रा. येळी, ता. पाथर्डी), रोहित ऊर्फ भैय्या रमेश कराळे (वय २२), अभिषेक सिताराम पवार (वय १९, दोघे रा. धामणगांव, ता. पाथर्डी) व विधीसंघर्षीत बालक अशी पकडण्यात आलेली आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार अंमलदार पोउपनि मनोहर शेजवळ व अंमलदार रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, संदीप चव्हाण, संतोष खैरे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१४ जून २०२४ रोजी टाटा कंपनीचे टेम्पोमध्ये सफरचंद भरुन मिरजगांव ते पाथर्डी असे घेऊन जाताना माणिकदौंडी घाट (ता. पाथर्डी) येथे अनोळखी चौघे दुचाकीवर येऊन टेम्पोवर दगड फेकून, टेम्पोला दुचाकी आडवी लावून मला व मित्रास चाकुचा धाक दाखवून लाथाबुक्यांनी मारहाण करुन खिशातील २२ हजार रुपये किंमतीचे विवो व ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल फोन बळजबरी चोरुन नेले, या ज्ञानदेव नारायण सुर्यवंशी (रा. कोकणगांव, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं.६१६/२०२४ भादविक ३९४,३४१,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.
ही घटना घडल्यानंतर एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना एलसीबीची टिम नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते.
एलसीबी टिम’ गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करुन, गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने आरोपींचा शोध घेत असताना दि.२७ जून २०२४ रोजी एलसीबी टिम’ला गुन्हा हा आरोपी अक्षय डमाळे (रा. शिरसाठवाडी, ता. पाथर्डी) याने त्याचे इतर साथीदारांनी केला. ते आता पाथर्डी ते धामणगांव देवी जाणारे रोडवर असलेल्या वनदेव डोंगरामध्ये रस्त्याचे कडेला बसलेले आहेत, आता गेल्यास मिळून येईल अशी माहिती मिळाल्याने एलसीबी टिम’ला मिळाली, त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन खात्री करता पाथर्डी ते धामगांव देवी जाणारे रोडवरअसलेल्या वनदेवी डोंगराचे कडेला रस्त्यालगत एका दुचाकीजवळ चौघे बसलेले दिसले. त्यावेळी एलसीबी टिम’ची खात्री झाल्याने संशयीतांना अटकाव करुन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अक्षय अशोक डमाळे , रोहित ऊर्फ भैय्या रमेश कराळे, अभिषेक सिताराम पवार व विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या इसमांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतील १ ओप्पो, १ रेडमी, ३ विवो कंपनीचे मोबाईल फोन व शाईन दुचाकी मिळून आली. त्याबाबत विचारपुस करता आरोपींनी त्यांचा फरार साथीदार सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामणगांव, ता. पाथर्डी) अशांनी मागील १० ते १५ दिवसापूर्वी दुचाकीवर जाऊन माणिकदौंडी घाट, (ता. पाथर्डी) येथे टेम्पो आडवून केलेल्या चोरीतील मोबाईल फोन असल्याचे सांगितल्याने आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपींकडे अधिक विचारपुस करता त्यांनी पाडळी शिवार (ता. पाथर्डी) परिसरात काही दिवसांपूर्वी दुचाकी आडवुन इलेक्ट्रीक काटा व रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०१/२०२४ भादविक ३९४,३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.
ताब्यातील आरोपींचे अंगझडतील मिळून आलेला १५ हजार रुपये किंमतीचा १ ओप्पो, १० हजार रुपये किंमतीचा १ रेडमी, ३० हजार रुपये किंमतीचे ३ विवो कंपनीचे मोबाईल फोन व ८० हजार रुपये किंमतीची १ शाईन दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेऊन पाथर्डी पोलिस ठाण्यात गु.र.नं. ६१६/२०२४ भादविक ३९४, ३४१, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहे.


