माजी आमदारला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कोटीच्या खंडणीची मागणी ; दोन महिलांसह तिघांवर गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : बीड जिल्ह्यातील माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. या घटनेबाबत अहमदनगर येथील दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका यूट्यूब पत्रकाराचा समावेश असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. हा गुन्हा जानेवारी ते दि.२६ जून २०२४ दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडली. या प्रकरणी नगर येथील गायकवाड व बांगर (पूर्ण नाव समजले नाही) या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर नामक एका यूट्यूब पत्रकाराविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे फिर्यादीत?
प्रस्तुत आरोपींनी संगनमत करून आमच्याकडे फिर्यादीची अश्लील व्हिडिओ क्लिप आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करून तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू, अशी धमकी देत 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील 25 हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत, असे माजी आमदार धोंडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी इस्लाईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर हा एका न्यूज पोर्टलचा पत्रकार आहे. त्याची कोतवाली पोलिस ठाण्यात सतत ये-जा सुरू होती. पण आता त्याच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.


