जरांगे यांचे उपोषण ओबीसीचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी ?

जरांगे यांचे उपोषण ओबीसीचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी ?
भगवानगडाच्या पायथ्याशी ओबीसी समाज आक्रमक ?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : मनोज जरांगे याचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चाललेले आंदोलन हे नौंटंकी आंदोलन असून नाटकातील एकपात्री पात्र या भूमिकेतून केले गेलेले हे आंदोलन आहे. जरांगे हा शरद पवारांच्या दावणीला बांधलेला बैल असल्याची उपासात्मक टीका भगवानगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आली. तसेच ओबीसींचे राजकीय अस्तित्व हेतू पुरस्कार संपवण्याचे षडयंत्र शरद पवार आणि जरांगे यांच्या माध्यमातून चालू असल्याचे आरोप सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आला. ओबीसी आरक्षण आणि संरक्षण बचाव आंदोलनाचे ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचे दि.27 जून रोजी सायंकाळी भगवानगडावर श्री.संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आगमन होणार आहे. दि. 28 जून रोजी सकाळी खरवंडी कासार येथे श्री संत भगवानबाबा मंगल कार्यालयात ओबीसी समाजाचा मेळावा संपन्न होणार आहे.

यावेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांचे स्वागत करणार असल्याचे सांगून मराठा समाजाला दिलेले सरसकट कुणबी दाखले रद्द करण्यात यावेत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये आणि सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी तात्काळ रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागण्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी संवाद मेळावा बैठकीत करण्यात आल्या. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रदूषण आयुक्त ओबीसी नेते दिलीप खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर, भाजपा चिटणीस वामन कीर्तने, सरपंच वैजनाथ खेडकर, उपसरपंच तुकाराम खेडकर, धनंजय गरकळ, सुनील ढाकणे ,विठू पालवे, गणेश जवरे, कपिल खेडकर, सुनील जवरे आदिंसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!