शिक्षक मतदार संघ निवडणूक : तीन उमेदवारांकडून ६ नामनिर्देशनपत्रे सादर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नाशिक : शिक्षक मतदार संघ निवडणूक 2024 ची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना 31 मे, 2024 रोजी प्रसिद्ध झाली आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी दि. 3 जून, 2024 रोजी 3 उमेदवारांकडून 6 नामनिर्देशनपत्रे सादर करण्यात आली आहेत.
यात राजेंद्र एकनाथराव विखे पा, (मु. पो. लोणी बु. ता. राहता जि. अहमदनगर) यांनी दोन नामनिर्देशन पत्र अपक्ष मधून सादर केली आहेत. निशांत विश्वासराव रंधे, 7 ब-पित्रेश्वर कॉलनी शिरपूर, ता. शिरपूर जिल्हा धुळे यांनी तीन नामनिर्देशन पत्र सादर केली असून दोन अपक्ष व एक भाजपातून नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. राजेंद्र दौलत निकम (मु. पो. गुगळवाड ता. मालेगाव जि. नाशिक) यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.


