रांजणगांव मशिद दरोडा प्रकरणातील ६ आरोपींना पकडले ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी

रांजणगांव मशिद दरोडा प्रकरणातील ६ आरोपींना पकडले ; नगर एलसीबीची महत्त्वपूर्ण कामगिरी
४ गुन्ह्यांची कबुली ; २ लाख ६८ हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर : तालुक्यातील रांजणगांव मशिद दरोडा प्रकरणातील ६ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून २ लाख ६८ हजार ५०० रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. ही महत्त्वाची कामगिरी नगर एलसीबी टिम’ने केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि सोपान गोरे, समाधान भाटेवाल व अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, रविंद्र घुगांसे, रोहित येमुल, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, जालिंदर माने, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे व ज्योती शिंदे आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सुपा पोलिस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्याची एसपी ओला यांनी तातडीने दखल घेत तपासाची यंत्रणे फिरवली. तत्पूर्वी नगर एलसीबीच्या दोन विशेष टिम तयार करुन टिमला आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सूचना दिल्या. नगर एलसीबी टिम’ने फिर्यादी व त्यांच्या कुटूंबियाकडून आरोपींचे वर्णन, आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत व गेलामाल याबाबत माहिती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करताना पोनि दिनेश आहेर यांना गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी रमेश भोसले (रा. कामरगांव, ता. नगर) याने त्याचे इतर साथीदारासह केला आहे. आरोपी कामरगांव शिवारातील नगर पुणे रोडवरील हॉटेल संतोष जवळ येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने पोनि श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती एलसीबी टिमला देऊन सुपा पोलीस ठाण्याचे अंमलदारांना सोबत घेऊन कारवाई करण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. एलसीबी टिम’ने कामरगांव शिवारातील हॉटेल संतोष येथे सापळा लावून थांबलेले असताना थोडाच वेळात विठ्ठलवाडी रोडने माहितीप्रमाणे एक संशयीत पायी येताना एलसीबी टिम’ला दिसला. एलसीबीची खात्री होताच त्यास ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतास पोलीस पथकाची चाहुल लागून तो पळून जाऊ लागताच अंमलदारांनी संशयीताचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगून त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव रमेश ऊर्फ मुकेश सिताराम भोसले (वय ३०, रा. विठ्ठलवाडी रोड, कामरगांव, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस करता संशयीताने दोन दिवसांपूर्वी त्याचे इतर साथीदार दिनेश भोसले, सागर भोसले, शशिकांत भोसले, वसिम भोसले, राहुल भोसले (सर्व रा. विठ्ठलवाडी रोड, कामरगांव शिवार, ता. नगर) व पायल काळे (रा. भोरवाडी, ता. नगर) अशा सर्वांनी मिळून रांजणगांव मशिद, (ता. पारनेर) येथील एका घरात जाऊन घरातील लोकांना लाकडी दांडके व कत्तीने मारहाण करुन चोरी केल्याचे सांगितले.
एलसीबी टिम’ने लागलीच सुपा पोलीस ठाण्याचे अंमलदार संदीप पवार यांना सोबत घेऊन ताब्यातील आरोपींचे साथीदारांचा कामरगांव शिवारात शोध घेता ते त्यांच्या राहत्या घराजवळ विठ्ठलवाडी रोडवर मिळून आल्याने आरोपी दिनेश वत-याब भोसले (वय ३३), सागर पानतास भोसले (वय २२), शशिकांत ऊर्फ सोंड्या सिताराम भोसले (वय २४), वसिम वत-याब भोसले (वय १९), राहुल रवि भोसले (वय २४, सर्व रा. विठ्ठलवाडी रोड, कामरगांव शिवार, ता. नगर) यांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीचा साथीदार पायल काळे ( रा. भोरवाडी, ता. नगर) हा फरार झाल्याने तो पोलिसांना सापडला नाही
ताब्यातील आरोपींकडे टोळीने आणखीन कोठे कोठे व किती गुन्हे केले, याबाबत अधिक सखोल व बारकाईने चौकशी करता टोळीतील सदस्यांनी मिळून दोन अडीच महिन्यात पारनेर तालुक्यातील रांजणगांव मशिद, ढवळपुरी, पिंप्रीगवळी या ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले. याबाबत अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता ४ गुन्हे उघडकिस आलेले आहेत.
ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेली वाहने व हत्यारे याबाबत विचारणा करता आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील माल घरात व घराचे आजुबाजूला लपवून ठेवल्याचे सांगितले. आरोपींकडून १५ ग्रॅम वजनाचे १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे ३७ हजार ५०० रुपये किंमतीचे डोरले, २४ हजार ५०० रुपये रोख, १ लाख रुपये किंमतीची पल्सर दुचाकी व १ हजार ५०० रुपये किंमतीची २ लोखंडी कत्ती व १ लोखंडी तलवार असा एकूण २ लाख ६८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने ताब्यातील आरोपींना सुपा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १८७/२४ भादविक ३९५ या गुन्ह्याचे तपासकामी सुपा पोलीस ठाण्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले. पुढील तपास सुपा पोलीस करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!