महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असंख्य युवकांचा प्रवेश युवकांना दिशा देण्याचे काम मनसे करेल – अ‍ॅड.अनिता दिघे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असंख्य युवकांचा प्रवेश युवकांना दिशा देण्याचे काम मनसे करेल – अ‍ॅड.अनिता दिघे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
 अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकरणात मोठे बदल होत आहेत, नेत्याकडे पक्ष निष्ठा नागरिकांचे प्रश्न याकडे काहीही देणे-घेणे राहिले नाही. कोणताही ठोस कार्यक्रम कोणाकडे नसल्याने स्वार्थासाठी अनेकजण या पक्षातून त्या पक्षात जात आहे. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठोस भुमिका घेत    मराठी माणसांच्या प्रगतीसाठी झटत आहेत.  नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करणारे पदाधिकारी असल्याने अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. त्यामुळे अनेकांचा मनसेवर मोठा विश्वास निर्माण होत आहे. युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत असल्याने युवक मनसेमध्ये दाखल होत आहे. या युवकांना दिशा देण्याचे काम मनसेच्यावतीने करण्यात येईल, असे प्रतिपादन मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे यांनी केले.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असंख्य युवकांचा प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, महिला जिल्हाध्यक्षा अ‍ॅड.अनिता दिघे, शहर सचिव डॉ.संतोष साळवे, उपाध्यक्ष तुषार हिरवे, विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदि यावेळी सनी भुजबळ, चेतन येरगुंडला, यश चितळे, बंटी साबळे, समीर शेख, पियुष उमरवाल, साहिल वाकुडे, नितेश कांबळे, अमित कस्तुरी आदिंनी मनसेमध्ये प्रवेश केला.
याप्रसंगी गजेंद्र राशिनकर म्हणाले, नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची मनसेची स्टाईल नागरिकांना भावत आहे. प्रश्न मार्गी लावल्याशिवास स्वस्थ बसत नाही. त्यामुळे नागरिकही आपल्या कामांसाठी मनसेकडे येत आहेत. युवकांचे शैक्षणिक, नोकरी अशा प्रश्नांना प्राधान्य दिल्याने मनसेबद्दल युवकांमध्ये आकर्षण आहे. आज मनसेत दाखल झालेले युवक हे पक्षाचे ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रवेश झालेल्या युवकांनी मनसेच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते सोडविण्याचा आपण प्रयत्न करु, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण रोकडे यांनी केले तर तुषार हिरवे यांनी आभार मानले.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!