
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः रात्रीगस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार टाकण्यात आलेल्या छाप्या दरम्यान कोतवाली पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले. या छाप्यात तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गाई जनावरे व 3 म्हशी, तर अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकूण 20 लाख 55 हजार रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे. अरबाज खलील शेख (वय 23, रा. कोठला, अहमदनगर), फैजल अस्लम शेख (वय 20, रा. बेपारी मोहल्ला, झेंडीगेट, अहमदनगर), सलीम शब्बीर कुरेशी, फैजान अब्दुल कुरेशी ( रा. झेंडीगेट, अहमदनगर) अशी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर शहर डिवायएसपी अमोल भारती आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार पोउपनिरी गजेंद्र इंगळे, गुन्हे शोध पथकाचे पोउपनिरीक्षक प्रविण पाटील, पोहेकॉ तनवीर शेख, पोहेकॉ संदीप पितळे, पोहेकॉ शाहीद शेख, मपोना संगीता बडे, पोकॉ. दिपक रोहोकले, पोकॉ. सत्यजित शिंदे, पोकॉ. तानाजी पवार, पोकॉ. सुरज कदम, पोकॉ. सोमनाथ केकाण, पोकॉ. शिवाजी मोरे, पोकॉ. महेश पवार, पोकॉ. अभय कदम, पोकॉ. अमोल गाडे, पोकॉ. संकेत थीवर आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.13 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास पोनि प्रताप दराडे यांना माहिती मिळाली. त्यानुसार अहमदनगर शहरात झेंडीगेट परिसरातील कारी मस्जिदजवळ बंद पडलेल्या सार्वजनिक शौचालयजवळ एका बंद खोलीवर तात्काळ रात्रगस्त पेट्रोलिंगचे अधिकारी,अंमलदार यांनी त्या ठिकाणी पंचासह 2.15 वाजता जाऊन छापा टाकला. यावेळी छाप्यात चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच पोलीसांनी पंचासमक्ष तीन मालवाहु गाड्या, दोन लोखंडी सत्तुर, 12 गौवंशीय जनावरे व 3 म्हैसवर्गीय जनावरे, अंदाजे 600 किलो गोवंशीय जनावराचे मांस असा एकूण20 लाख 55 हजार रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेतलेल्याविरुध्द पोकॉ. सुरज कदम यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं. 164/2024 भा.दं.वि.कलम 269, महा. प्राणी रक्षा अधि सन 1995चे सुधारीत सन 2015 चे कलम 5(अ), 5 (क ), 9, 9(अ), तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करणेबाबत अधि. 1960 चे कलम 11, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोना एपी इनामदार हे करीत आहेत.


