ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ; ओबीसींच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती सभेची जय्यत तयारी

ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा ; ओबीसींच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती सभेची जय्यत तयारी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर: नगरच्या क्लेराब्रुस हायस्कूलच्या मैदानावर दिनांक 3 फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सकल ओबीसी आयोजन समितीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते ना. छगनराव भुजबळ, विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार, आ.गोपीचंद पडळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आ. प्रकाश शेंडगे, आ. प्रा.राम शिंदे, कल्याणराव दळे, प्रा. लक्ष्मणराव गायकवाड, शब्बीरभाई अन्सारी, पी.टी. चव्हाण, दौलतराव शितोळे, सत्संगजी मुढे, लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे.


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजाचा विरोध नव्हता व नाही परंतु ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण दयावे. अशा प्रकारची स्पष्ट भूमिका ओबीसी समाजाची होती व आहे.
परंतु मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजात यामुळे तीव्र असंतोष व अस्वस्थता निर्माण झालेली आहे. तसेच एक प्रकारची अन्याय झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये ओबीसींचा पहिला भव्य मेळावा होणार आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. अशी आग्रही मागणी ओबीसी समाजाच्या वतीने पुढे करण्यात येत आहे.
या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर शहरातील पार्किंगची व्यवस्था पांजरपोळ मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ, मार्केटयार्ड चौक, YMC मैदान, खालकर हॉस्पिटलजवळ, अहमदनगर बॉईज हायस्कूल मैदान, कोठी रोड, येथे करण्यात आलेली आहे. तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे.
लोकनेते कै. बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संखेने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!