संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः तालुक्यातील हनुमानटाकाळी येथील श्री समर्थ हनुमान देवस्थान जागेचा 40 वषार्र्ंपासून सुरु असलेला वाद हा 40 मिनीटात मिटविण्यात पाथर्डी पोलिसांना यश आले आहे. या बैठकी दरम्यान निर्णय हा भविष्यात हनुमानटाकळी येथे कोणत्याही कारणातून कोणतीही कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण होणार या दृष्टीकोनातून श्री हनुमान देवस्थान समिती व सुभाष भास्कर दगडखैर यांना मान्य असल्याबाबतचा श्री समर्थ हनुमान देवस्थान समिती हनुमानटाकळी (ता.पाथर्डी) यांनी समितीचा ठराव केला असून, तो ठराव सर्वानुमते मंजूरही करण्यात आला आहे. यामुळे हा अनेक वषार्र्ंपासून सुरु असणारा वाद आजअखेर तो संपुष्टात आला आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील श्री समर्थ हनुमान देवस्थान (हनुमानटाकळी) येथील देवस्थानचे संरक्षक भितीचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावरुन हनुमान देवस्थान समिती व सुभाष भास्कर दगडखैर यांच्यामध्ये सुमारे 40 वर्षापासून वाद सुरु होते. त्याबाबत हनुमान देवस्थान समिती (हनुमानटाकळी) यांनी सुभाष भास्कर दगडखैर यांच्याविरुध्द पाथडी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. त्यावरुन दि.4 ऑगस्ट 2025 रोजी पाथर्डी पोलिस ठाण्यात पोनि विलास पुजारी यांनी आपल्या सहकार्यासह देवस्थानास ठिकाणी भेट देऊन समर्थ हनुमान देवस्थान समितीचे सदस्य व सुभाष भास्कर दगडखैर यांच्यामध्ये ग्रामस्थ हनुमानटाकळी (ता.पाथर्डी) यांच्या उपस्थितीत समेट घडवून आणला. अनेक वषार्र्ंपासून प्रलंबित वाद हा कायमस्वरुपी मिटविला. हा वाद मिटवितांना समर्थ हनुमान देवस्थानचे पाठीमागील लगत दक्षिणेस बांधण्यात येणारी दक्षिणोत्तर अशी संरक्षक भिंत ही सुभाष भास्कर दगडखैर यांच्या इमारतीच्या पश्चिम भिंतीपासून पश्चिमेस 5 फुट अंतरावर निश्चित करण्यात आली. समर्थ हनुमान देवस्थानचे प्रदक्षिणा मार्गापासून दक्षिणेस 15 फुट अंतरावर व सुभाष दगडखैर यांच्या इमारतीचे उत्तर बाजूस असलेल्या जांभळीचे झाडापासून उत्तरेस 2 फुट अंतरापर्यंत व समर्थ हनुमान देवस्थानचे प्रदक्षिणा मार्गापासून दक्षिण पूर्व कोपर्यात 15 फुट अंतरापयर्र्ंत अशी हनुमान देवस्थानचे संरक्षक भिंतीची हद्द निश्चित करण्याचे ठरले आहे.वादा हा संपुष्टात आणण्यासाठी पाथर्डी पोनि विलास पुजारी यांनी समर्थ हनुमान देवस्थानचे सर्व सदस्य, हनुमानटाकळी ग्रामस्थ व सुभाष भास्कर दगडखैर यांच्या उपस्थितीत सोमवारी दि.4 ऑगस्ट2025 रोजी बैठक घेतली. तेथे निर्णय घेताना हा वाद भविष्यात हनुमानटाकळी येथे कोणत्याही कारणांवरुन न होता त्या देवस्थान ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी निर्णय हा हनुमान देवस्थान समिती व सुभाष भास्कर दगडखैर यांना मान्य असल्याबाबत श्री समर्थ हनुमान देवस्थान समिती, हनुमानटाकळी (ता.पाथर्डी) यांनी समितीचा ठराव केला आहे. तो ठराव सर्वानुमते मंजूरही यावेळी करण्यात आला आहे.