30 लाखांचा गांजा जप्त ; अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम, अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : ओडीसा राज्यातून विक्री करता आणलेला 120 किलो 905 ग्रॅम वजनाचे गांजासह एकूण 80 लाख 83 हजार 464 रुपये किंमतीचे मुद्देमाल ताब्यात घेण्याची मोठी कारवाई अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचने केली आहे.
एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांच्या सूचनेनुसार पोउपनि अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संतोष खैरे, दीपक घाटकर, फुरकान शेख, लक्ष्मण खोकले, राहुल द्वारके, अमृत आढाव, आकाश काळे, रमिझराजा आतार, प्रकाश मांडगे, सागर ससाणे, भगवान धुळे, उमाकांत गावडे, अरुण मोरे, जयराम जंगले आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एसपी सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबवून अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणा-यांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांनी दोन विशेष टीम तयार करुन अमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांची माहिती काढणेबाबत टीमला सूचना देऊन रवाना केली होती.
दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी पोनि श्री. कबाडी यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोनि श्री कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन तपासी टीम, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टीमसह शेंडी बायपास ते एमआयडीसी. जाणा-या रोडवर वडगांव गुप्ता गावच्या शिवारातील हॉटेल किनाराजवळ सापळा रचून थांबले असता ट्रक येतांना दिसला, तो ट्रक चालकास रोडच्या बाजूला थांबविण्यास सांगितला. यावेळी ट्रकमधील दोघांना अटकावून ठेवत, त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे नवनाथ अंबादास मेटे (वय 38, रा. ढोरजे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), ज्ञानेश्वर दत्तात्रय फुंदे (वय 31, रा. मळेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्यांचे ताब्यातील ट्रकची पंच, फॉरेन्सिक टीम यांच्या मदतीने झडती घेतली असता ट्रकच्या केबीनवरील टपावर 6 गोण्यामध्ये 30 लाख 22 हजार 625 रुपये किमतीचा 120 किलो 905 ग्रॅम गांजासह एकूण 80 लाख 83 हजार 464 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यांची चौकशी करता त्यांनी गांजा हा त्यांचा साथीदारांचा असून तो विक्रीकरीता आणला असल्याचे सांगितले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध पोकॉ प्रकाश मांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी. पोलीस ठाणे गु.र.नं. 650/2025 गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींचे ताब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा मिळून आला आहे. गांजा तस्करीची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने एसपी श्री घार्गे यांच्या आदेशाने गुन्ह्याचा तपास अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचकडे देण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अनंत सालगुडे हे करीत आहेत.


