3 वषार्र्ंपासून बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फरारी आरोपीस पकडला, नगर ग्रामीण डिवायएसपी टिम’ची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः 3 वर्षांपासून बलात्कार व अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नगर ग्रामीण डिवायएसपी टिमने पकडला. कलीम उर्फ सोनु महेबुब शेख (वय 28 रा.पाळे बु. ता. कळवण जि. नाशिक) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण डिवायएसपी ऑफिसचे पोसई शिवाजी ढवळे, पोहेकॉ रविकिरण सोनटक्के, पोकॉ निखिल मुरुमकर व पोकॉ सचिन वीर आदिंच्या टिमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 5 ऑगस्ट 2021 रोजी पारनेर पोलीस ठाण्यात गुरनं. 562/2021 भादंवि कलम 376, 417, 323, 504. 506 सह अ.जा.ज.अ.प्र.का.क.3 (1) (डबल्यू) (ाा), 3(2) (व्ही-ए)प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात आरोपी कलीम उर्फ सोनु महेबुब शेख हा गुन्हा दाखल झालेपासून फरार होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांनी त्यांचेकडील तपास करणार्‍या टिमला तपासाचे आदेश दिले होेते.त्यानुसार तपासातील टिममधील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती तसेच तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपी हा संगमनेर शहरात राहत असल्याबाबतची खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्याप्रमाणे मिळालेल्या माहितीच्या आधारे नगर ग्रामीण डिवायएसपी टिमने संगमनेर शहरात जाऊन तेथील नेमणुकीचे पोकॉ रोहिदास शिरसाठ यांना मदतीस घेऊन आरोपी राहत असलेल्या परिसरात सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीला पोलीस पथकाची ओळख सांगून त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने त्याचे नाव कलीम उर्फ सोनु महेबुब शेख (रा.पाळे बु. ता.कळवण जि. नाशिक) असे असल्याचे सांगितले. तत्या पोिलिसांनी ताब्यात घेऊन नगर ग्रामीण डिवायएसपी कार्यालयात हजर केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!