माजी आ.स्व.अनिल राठोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – स्व.अनिल राठोड यांनी नेहमीच जनतेच्याला प्राधान्य देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. कायम जनतेची कामे झाली पाहिजे, यासाठी ते नेहमीच अग्रही असत. त्यांचा हा झंझावत जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर होता. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्यावर त्यांनी नितांत निष्ठा व प्रेम केले. सर्वसामान्यांचा ‘भैय्या’ ही ओळख त्यांच्या कार्याची पावती होती. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही. त्याचे कार्य सामाजिक उपक्रमातून पुढे नेण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
माजी आ.स्व.अनिल राठोड यांच्या स्मृतीदिनानिमित्त नेता सुभाष चौक येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, काका शेळके, परेश लोखंडे, हर्षवर्धन कोतकर, गौरव ढोणे, सुरेश क्षीरसागर, विशाल वालकर, अंबादास शिंदे, निलेश भाकरे, पारुनाथ ढोकळे, अरुण झेंडे आदि उपस्थित होते.
यावेळी अनिल शिंदे म्हणाले, नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यात स्व.अनिल राठोड यांचे मोठे योगदान राहिले आहे. लोकांची कामे करुन त्यांना न्याय देण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. त्यामुळे अनेक लोक शिवसेनेशी जोडली गेली आणि त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेने विजय मिळविला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देऊन त्यांना विविध पदे मिळवून दिली. त्यांचे कार्य अविस्मरणीय असेच राहील, असे सांगितले.


