एसपी पाटील व आरटीओ पवार यांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : अनेक शाळांसमोर स्कूलबस उभ्या असतात शाळेत जाताना व घरी परत जाताना अनेक मुलं अनावधानाने रस्त्यावर धावतात त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघातही घडले आहेत. मात्र हे सर्व टाळण्यासाठी आणि स्कूलबसची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने नगर शहरातील विविध शाळांच्या मैदानात शाळेतील विद्यार्थ्यांना चढ -उतार करण्यासाठी स्कूल बस थांबा मिळाल्यास मुलांना रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही. असे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार यांना शहर वाहतूक सेना प्रमुख संजय आव्हाड यांच्या वतीने देण्यात आले आहे.
शहरातील अनेक शाळांसमोर रस्त्याच्याकडेला स्कूल बस उभ्या असतात. रस्त्यावरील रहदारी शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांची लगबग त्याच रस्त्यावरून मुले स्कूल बस मध्ये चढतात उतरतात त्यात अनेकदा अपघाताची शक्यता असते. रस्त्यावर स्कूलबस थांबणे चुकीचे असून या स्कूलबस साठी शाळेच्या मैदानातच थांबा देण्यात यावा अशी विनंती शहर वाहतूक सेनेचे प्रमुख संजय आव्हाड यांनी केली आहे .
या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह राज्य वाहतूक सेना प्रमुख उदय दळवी, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ यांना पाठविण्यात आल्या आहेत.




