सोलार कंपनी कर्मचाऱ्यांना मारहाण, तोडफोड करणाऱ्या ५ जणांना २ दिवस पोलिस कोठडी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी: तालुक्यातील मांडवा येथील सोलार कंपनीतील कर्मचाऱ्यांना मारहाण करुन जबरीने मोबाईलसह इतर मुद्देमाल काढून घेऊन सोलार प्लंटवर तोडफोड करणाऱ्या पाच आरोपींना पाथर्डी पोलीसांनी अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. महेश मच्छींद्र लंवाडे, शंकर भाऊसाहेब बडे, अप्पासाहेब श्रीपती गावडे, महेश संभाजी बडे, सागर अरुण बर्डे आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सूचनेनुसार पोउपनि महादेव गुट्टे, पोउपनि संदीप ढाकणे, पोहेकॉ नितीन दराडे, पोहेकॉ अभयसींग लबडे, पोना सुखदेव धोत्रे, पोकाॅ वडते, पोकॉ संजय जाधव, पोकाॅ शाम बनकर, पोकाॅ सागर बुधवंत यांच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मांडवा ता. (पाथर्डी) येथे बॉडडा इंजिनियरींग लि. हैद्राबाद या कंपनीमार्फत सोलार प्लांटचे काम चालू आहे. दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.३५ वाजण्याच्या सुमारास सुमारास, शुक्रवारी ( दि.८ ऑगस्ट २०२५) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास व दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तसेच दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी नोकरी करत असलेल्या कंपनीचे चालू असलेले सोलर प्रोजेक्टचे काम यातील महेश मच्छींद्र लंवाडे, शंकर भाऊसाहेब बर्डे, अप्पासाहेब श्रीपती गावडे, महेश संभाजी बडे, सागर अरुण बडे, अक्षय लंवाडे व आणखी अनोळखी ५ जण यांनी मला तसेच कंपनीचे कामगार यांना तुम्ही काम बंद करुन येथून निघून जा अशी दमदाटी करुन शिवीगाळ व मारहाण करुन कंपनीचे वॉचमन मिलींद पाटील व मयुर बाबासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ, दमदाटी करुन त्यांना लाथाबुक्याने मारहाण करुन त्यांचे वापरते मोबाईल व तिन प्लास्टीकच्या खूर्चा बळजबरीने चोरुन नेले आहेत. साईटवर असलेल्या ट्रॅक्टरची व काँक्रीट मिक्श्चरची तोडफोड करुन नुकसान केले आहे, या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरंन ८५४/२०२५ भारतीय न्याय साहिंता कलम १८९(२),१९०,१९१(२),११९(१),११५(२),३२४(४),३५१(२),३५२ प्रामाणे दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपी महेश मच्छींद्र लंवाडे, शंकर भाऊसाहेब बडे, अप्पासाहेब श्रीपती गावडे, महेश संभाजी बडे, सागर अरुण बर्डे यांना पोलीसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अटक केली आहे. या सर्व आरोपींना न्यायालयाने दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे करत आहेत.


