सैनिक स्कूलसाठी आदित्य ढाकणेची निवड


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव-
जानेवारी 2022 मध्ये झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहीगाव ने संचलित ,हातगाव येथील श्री रामेश्वरदास विद्यालयाचा इयत्ता ५ वीचा विद्यार्थी आदित्य निलेश ढाकणे याची चंद्रपूर येथील सैनिक स्कूलमध्ये सहावीत प्रवेश परीक्षासाठी निवड झाली आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुश पोटभरे यांनी दिली.


आदित्य ढाकणे याने 300 पैकी 249 गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून राज्यात १० वा क्रमांक मिळवला आहे. त्याला शाळेचे शिक्षक बाळासाहेब कोकरे, भागवत वाघ, मोहन उंडे, सुनील काशीद, सतीश सुपारे ,सिताराम करंजे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. या यशाबद्दल आदित्य याचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील, संस्थेचे सचिव माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा,नामदार सौ राजश्रीताई घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, सरपंच अरुण मातंग, उपसरपंच सौ नंदाताई बर्गे, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी व्हाईस चेअरमन ज्ञानदेव अभंग, संजय गलांडे यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, पालक व वंजारी ओबीसी विकास महासंघ राष्ट्रीय संपर्कप्रमुखचे दादासाहेब ढाकणे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!