संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
आष्टी – सगळीकडेच लंपी रोगाने थैमान घातल्याने शेतक-यांचे पशुधन संकटात आले आहे. या परिस्थितीत आष्टी तालुक्यातील सुंबेवाडीत लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखून पशुधन वाचवण्यासाठी सरपंच अशोक आण्णा पोकळे यांच्या माध्यमातून सुंबेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लंपी स्किन हा आजार कोरोना प्रमाणेच एका संक्रमित जनावरांपासून दुस-या जनावरांना होतो. यावर लस उपलब्ध आहे, परंतु ही लस सध्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ही लस उपलब्ध करून सुंबेवाडी येथे जनावरांना देऊन लसीकरण १०० टक्के पूर्ण केले आहे.
लंपी रोगाला रोखण्यासाठी लसीकरणाठी प्रामुख्याने सुंबेवाडीचे सरपंच योगेश शेळके, उपसरपंच अशोक गागरे, ग्रा सदस्य अनिल शेळके,सुभाष वाळके,अर्जून शेंडगे आदिंनी पुढाकार घेतला. या सर्वांना पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी मोरे , सर्व डॉक्टर्स, गावातील सौरभ खांदवे, मंगेश साबळे, आकाश शेळके, कृष्णा शेळके आदिंसह गावातील तरूणांनी मदत केली.


