सावळविहीर बु. न्यू इंग्लिश शाळेत कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पा. यांची १२५ जयंती साजरी

सावळविहीर बु. न्यू इंग्लिश शाळेत कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पा. यांची १२५ जयंती साजरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
राहाता : सावळविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे सहकारी साखर कारखानदारीचे जनक कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पा. यांची १२५ जयंती व शेतकरी दिन यानिमित्ताने कार्यक्रम पार पडला. यावेळेस शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्थानिक सल्लागार समितीचे वतीने बिस्कीटचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप शाळेचे माजी विद्यार्थी किरण राजेंद्र आगलावे पाटील यांनी केले.
याप्रसंगी पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. यांच्या जीवन कार्याचा गौरव स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे पा. यांनी करून शेतकरी दिनाचे ही महत्त्व सांगितले.
यावेळी उपसरपंच विकास जपे पा., ग्रामपंचायत सदस्य संजय जपे पा. माजी उपसरपंच गणेश कापसे पा., सागर आरणे, किरण आगलावे पा., पत्रकार राजेंद्र दुनबळे, मुख्याध्यापिका सौ.डहाळे मॅडम, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!