साईमंदिर कलशारोहणाचा वर्धापनदिन उत्साहात


👉  शिर्डी येथे साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापनाचा दिवस
👉डॉ. पारनेरकरांच्या पादुका पूजन व सुवर्ण कलशाच्या प्रतिमेच्या पूजनाने साजरा करण्यात आला
. 👉साई मंदिर सुवर्ण कलशारोहणाचा वर्धापन व स्मृती दिन साई संस्थानने साजरा करावा – सचिन तांबे पा.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा 👉ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी- 
1952 साली साईमंदिरावर कलशाची स्थापना पारनेरकर महाराजांच्या हस्ते करण्यात आली. या संपूर्ण घटनेला आज 69 वर्ष पूर्ण झाल्याने वर्धापनदिन शिर्डी येथे द्वारकामाई मंदिरासमोर  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी साईबाबांसॊबत असणाऱ्या सर्व घटना व समकालीन संतांचे अभ्यास करून जतन केले पाहिजे असे मत व्यक्त करून आजचा सुवर्ण योग्य जुळून आणल्याने मनशांती सह आनंद झाला.
सचिन तांबे पा. यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगताना दासगणू महाराजांची जयंती आम्ही सुरु केली. तो कार्यक्रम संस्थानने स्वीकारला तसेच साई मंदिर सुवर्ण कलशारोहणाचा वर्धापन व स्मृती दिन साई संस्थानने साजरा करावा, असे मत मांडून शिर्डीत पहिल्यांदाच असा कार्यक्रमाचे नियोजन करायला मिळणे हे आमचे भाग्यच!
याप्रसंगी पारनेर सेवा मंडळाचे अरविंद पाटील यांनी पूर्णवादाचे विवेचन केले.

कार्यक्रमाचे पौरोहित्य रत्नपारखी परिवाराने केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष सचिन कोते,नगरसेवक अशोक गोंदकर  अजित पारख, सचिन शिंदे, सुरेन्द्र महाले,संदीप पारख, सर्जेराव कोते, प्रमोद गोंदकर, सुनील परदेशी, वैभव कोते, विनायक रत्नपारखी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबलू वर्पे, अरुण हजारे, आकाश त्रिपाठी, दत्तू झाकणे,किरण परदेशी, मोहन क्षत्रिय, आदित्य वारुळे, सचिन शेजवळ, शिवम अग्रवाल, हेरंब शिरगावकर यांच्यासह सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन मणिलाल पटेल यांनी केले व आभार सुनील जोशी यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!