संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – अहमदनगर फटका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांची प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग समिती च्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल असोसिएशन च्या वतीने मंत्रा रुसॉर्ट पुणे येथील सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आले.
या वेळी बोलतांना फटाका असोसिएशन चे सचिव संतोष बोरा म्हणाले श्रीनिवास बोज्जा हे नेहमीच सामाजिक कार्यात पुढे होऊन कार्य करीत असतात. असोसिएशन चे ही जबाबदारी ते अत्यंत यशस्वीरित्या सांभाळत आहेत. माताजीच्या कार्यात ही नेहमीच अग्रेसर होऊन काम करीत असल्याने त्यांच्या कामाची पावती म्हणजे त्यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड आहे. या पुढील त्यांच्या कार्यास असोसिएशन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्यात.
या वेळी बोलतांना नवनीर्वाचित अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले आज पर्यंत मी ज्या पद्धतीने काम केले त्या पेक्षाही या पुढे चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न राहील. कोणतेही काम करीत असतांना निस्वार्थी पणे केल्यास त्या कामास यश नक्कीच मिळते.
या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश क्षीरसागर यांनी केले. सर्वांचे स्वागत असोसिएशन चे उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे यांनी केले तर आभार असोसिएशन चे सहसचिव अरविंद साठी यांनी मानले. या वेळी असोसिएशन चे पदाधिकारी निखिल परभने, सुरेश जाधव, अनिल टकले, संतोष वल्ली, संतोष तोडकर, दाजी गारकर देविदास ढवळे, जयप्रकाश बोगावत, सुनील गांधी, राजू छल्लानी, गणेश परभने आदी उपस्थित होते.



