शेवगावचे ज्येष्ठ विधीतज्ञ विजयराव काकडे यांचे अपघाती निधन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : शेवगावचे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड विजयराव उर्फ पोपटराव जगन्नाथ काकडे यांचे आज दुपारी पावणे दोन च्या सुमारास शेवगाव येथील कृषी उत्पन बाजार समितीच्या समोर अपघाती निधन झाले आहे मृत्यू समयी ते ७४ वर्षाचे होत.
याबाबत माहिती अशी की रविवारी (दि.१८) शहरात एक खाजगी कार्यक्रम आटोपून ॲड विजयराव काकडे हे घराकडे येत असताना शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर पाथर्डी रोडवर दुचाकीवर घराकडे जात असताना आयसरचा जबर धक्का लागल्याने मागील चाकाखाली ते पडल्याने डोक्याला गंभीर मार लागला होता. या दरम्यान उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती शेवगाव शहरासह तालुक्यात होताच घटनास्थळी व शेवगाव ग्रामीण रुग्णालयात बार असोसिएशन नातेवाईक व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.

ॲड काकडे हे शेवगाव येथील पुरोगामी डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ विधी तज्ज्ञ होत. अत्यंत संयमी मितभाषी असलेले अँड विजयराव काकडे यांचा तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठा सक्रिय सहभाग होत, बोधेगाव जिल्हा परिषद गटाचे काही वर्ष नेतृत्व केले स्व माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे जुन्या काळातील अत्यंत विश्वासू खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत अत्यंत मोलाचा वाटा होता. १९९५ ला काँग्रेस पक्षाकडून पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणी केली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पाथर्डी विधानसभा मतदासंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती चांगली मते मिळवली होती त्यानंतर त्यांनी राजकारणात निवृत्ती घेतली गेली त्यांचा मागे पत्नी, विवाहित ॲड युवराज व ॲड अभिजित व हे दोघे चिरंजीव एक विवाहित मुलगी तर जनशक्ती मंचचे ॲड शिवाजीराव काकडे, ॲड सुभाषराव काकडे, माजी जिप सदस्य नितीनराव काकडे यांचे भाऊ व माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांचे दिर होत. त्यांच्या पाठीमागे भाऊ, भावजयी,सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्याच्या अपघाती निधना बद्दल हळहळ व्यक्त होत आहे


