शिवसेनेने लवकरच विचार करावा, राष्ट्रवादीचा जन्मच हा महाविकास आघाडीत शिवसेनेस संपविण्यासाठीच : खा. डाॅ. विखे पा


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर- 
शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधी नाही, फक्त टिकेचे धनी केले जात आहे. शिवसेनेने लवकरच विचार करावा, राष्ट्रवादीचा जन्मच हा महाविकास आघाडीत शिवसेनेला संपविण्याासाठीच झाला आहे, बुधवारी (दि.२५) नगर दक्षिणेचे खासदार डाॅ सुजय विखे पा. हे पञकारांशी बोलताना म्हटले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहराध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ओबीसीचे किशोर डागवाले, नगर तालुका ध्यक्ष मनोज कोकाटे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

खा.विखे पा पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष हा ३ वर्षापासून फक्त आरोप करण्यामध्येच मग्न आहे. सगळा निधी या महाराष्ट्रात ७६ टक्के बजेट राष्ट्रवादी काँग्रेस घेते. आणि  सगळा पक्षवाढीचा प्रवेश राष्ट्रवादी करत आहे. शिवसेना फक्त महाराजांना तिकिट न देण्याचा आरोप त्यांच्यावर, हनुमान चालीस भोंगा त्याच्यावर.  शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही निधी नाही, फक्त सगळ्या ञासांचे धनी केले जात आहे.तरी, शिवसेना या महाविकास आघाडीच्या बाहेर पडत नाही, ही फार मोठी शोकांतिका आहे. शिवसेनेने लवकरच विचार करावा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!