मदतीच्या माध्यमातून शिवसैनिक पुरग्रस्तांच्या पाठिशी- दिलीप सातपुते
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर – कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे, शेतीचे, व्यवसायांचे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या लोकांच्या पाठिंशी शिवसेना खंबीरपणे उभी असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पुरग्रस्त भागाचा दौरा करुन तेथील नागरिकांना दिलासा दिला. त्याचप्रमाणे त्यांनी आपला वाढदिवस शिवसैनिकांनी साजरा न करता पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार नगर शहर शिवसेनेच्यावतीने पुरग्रस्तांनासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवून त्यांना धीर देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. पुरामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नागरिकांसोबत शिवसेना उभी राहिल, असे प्रतिपादन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.
नगर शहर शिवसेनेच्यावतीने अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये जीवनावस्तूंच्या साहित्याचा ट्रक महाड येथे पाठविण्यात आला. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, संभाजी कदम, अनिल बोरुडे, संजय शेंडगे, मदन आढाव, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, गौरव ढोणे, अंबादास शिंदे, मंगेश शिंदे, आशा निंबाळकर, अरुण गोयल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेच्यावतीने पुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येत आहे. शिवसेनेने नेहमीच दु:खीतांचे आश्रु पुसण्याचे काम केले आहे. आज निर्माण झालेली परिस्थिती लवकरच पुर्ववत होईल. नुकसान झालेल्या नागरिकांना उभारी देण्यासाठी शिवसैनिक काम मदतीचा हात पुढे करतील. यापुढील काळातही नगर शहरातून आणखी मदत पाठविण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना काही मदत द्यावयाची असले त्यांनी ती शिवसेना कार्यालयात जमा करावी. जमा झालेली मदत पुन्हा पुरग्रस्तांना पाठविली जाईल, असे सांगितले.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, बाळासाहेब बोराटे आदिंनी मनोगत व्यक्त केले.



