
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्ह्यात दक्षिण शिवसेना जिल्हाप्रमुखपदी ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, उपजिल्हाप्रमुखपदी नगरसेवक सुभाष लोंढे आणि अहमदनगर शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक दिलीप सातपुते आदिंची निवड झाली आहे.
भिंगार शहर प्रमुखपदी सुनील लालबोंद्रे, जिल्हा संपर्कप्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव, पारनेर तालुकाप्रमुख विकास रोहकले तर श्रीगोंदा तालुकाप्रमुखपदी नंदकुमार ताडे आदिंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध शिवसेनेच्या अन्य पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.


