संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – शिक्षक आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीचे राज्यध्यक्ष अशोक बेलसरे यांचे मार्गदर्शनाखालील शिक्षक भारतीच्या अहमदनगर जिल्हा कार्यवाहक व नेवासा तालुका अध्यक्षपदी सुदामराव मते पाटील विद्यालय गोगलगाव ता नेवासाचे शिक्षक संजय भुसारी यांची तर कार्याध्यक्ष म्हणून अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन व संचालक ज्ञानेश्वर काळे यांची निवड तसेच जिल्हा कार्यवाह म्हणून शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव यांची निवड शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप यांनी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीच्या ऑनलाइन मिटिंगमध्ये जाहीर केली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे हे होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप व अजय सचिव सुनील गाडगे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेछ्या दिल्या. यावेळी शिक्षक भारतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भुसारी यांनी सांगितले की, आमदार कपिल पाटील यांना दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी शासनावर दबाव आणण्यासाठी आग्रह करणार असल्याचे सांगितले. कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले की, शाळा तेथे शिक्षक भारती संघटनेची स्थापना करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देऊ.
यावेळी सिकंदर शेख, विजय कराळे, महेश पाडेकर, जितेंद्र आरु, बाबासाहेब लोंढे, अशोक आव्हाड, मोहम्मद समी शेख, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे, संभाजी पवार, सोनवणे, केडी, संतोष शेंदुरकर, सोमनाथ बोंतले, योगेश हराळे, मार्गदर्शक त्रिमूर्तीचे प्राचार्य सोपानराव काळे , शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव , सचिव मुकुंद अंचवले , राम कर्जुले, तुकाराम फटांगरे, जयंत पाटील, गोरक्ष शिंदे, सुनील इंगळे, नानासाहेब काटे, नानासाहेब घुले,पोपट औटी,उपस्थित होते.



