संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नेवासा:-शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक व शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब व संघटनेचे राज्यध्यक्ष अशोकराव बेलसरे यांचे मार्गदर्शनाखालील शिक्षक भारती संघटनेचे शाळा तेथे शिक्षक भारती हे अभियान जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप व राज्य सचिव सुनील गाडगे यांचे नेतृत्वाखाली नेवासा तालुक्यात प्रत्येक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत राबवणार असल्याचे शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाहक व नेवासा तालुका अध्यक्ष संजय भुसारी यांनी सांगितले.
श्री भुसारी यांनी सांगितले की आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्वाखाली शिक्षक भारती संघटनेची वाटचाल चालु असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्नासाठी संघटना सदैव प्रयत्नशील आहे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या व नंतर 100%अनुदानावर आलेल्या कर्मचारी बांधवांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे, अंशतः आनुदाणीत 20 व 40 %अनुदान प्राप्त शाळां व तुकड्याना पुढील टप्पा तातडीने मंजूर करावा तसेच अघोषित शाळांना तातडीने अनुदान टप्पा मंजूर करावा या मागण्याचा प्राधान्याने विचार शासनाने विचार करावा यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे असे अहमदनगर जिल्हा कार्यवाहक व नेवासा तालुका अध्यक्ष संजय भुसारी यांनी सांगितले तसेच वरील मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच अहमदनगर जिल्ह्यातील शिष्टमंडळ शिक्षक आमदार कपिल पाटील यांची भेट घेणार आहे सदर शिष्टमंडळात संघटनेचे पदाधिकारी व मुनी पेन्शन योजना कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत .शाळा तेथे शिक्षक भरती अभियान राबवण्यासाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय भुसारी , जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख,मार्गदर्शक प्राचार्य सोपानराव काळे, राम कार्जुले, नबाब शहा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर काळे ,B गोरक्ष शिंदे, तुकाराम फटांगरे, प्रा गोवर्धन रोडे, जयंत पाटील, संजय काळे ,इस्माईल शेख , नितीन गडाख,सुनील इंगळे,शरद कराड,,प्रा गणपत घनवट, प्रा टाकळकर, श्यामसुंदर राशीनकर प्रा किशोर निमसे,प्रा बी पी वीरकर, प्रा सौ जे ए जंगले, प्रा सौ के एल गांगुर्डे प्रयत्नशील आहेत.



