पैशांची चोरी करणारी सराईत गुन्हेगार अटक, अडीच लाख जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

व्यापा-यांची चोरी करणारे सराईत गुन्हेगार अटक, अडीच लाख जप्त ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (Video) 
अहमदनगर : शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे व घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले आहे. या गुन्हेगारांकडून २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ३ गुन्हे उघडकीस आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी अहमदनगर एलसीबी टिम’ने केली आहे.
विठ्ठल संजय घोडके (वय २४) व सचिन सुभाष घोडके (वय ३३ दोन्ही रा. घोसपुरी, ता. नगर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, प्रभारी नगर शहर डिवायएसपी हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एलसीबी पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ सुनिल चव्हाण, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, पोकॉ अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, ऑफिसमध्ये लॉक असलेल्या ड्रॉव्हरमधील ३ लाख रुपये रोख रक्कम कोणीतरी अनोळखी चोरट्याने चोरुन नेली, या गुलाब पांडुरंग कराळे (वय ६८, धंदा कॉन्ट्रॅक्टर रा. वाकोडी, ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४/२०२४ भादविक ४५४,३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये दिवाळी सणाचे कालावधीत अहमदनगर शहरातील व्यापारी फिर्यादी दिपक टेकचंद आहुजा यांच्या दुकानातील २ लाख रुपये रोख रक्कम एक अनोळखी इसमाच्या गल्ल्यात हात घालून चोरुन नेली होती. तसेच फिर्यादी विकी श्रीचंद हरदवाणी हे दुकानातील रोख रक्कम बॅगेत ठेवून घराचे गेट जवळ उभे असताना अनोळखी दोघां आरोपींनी ५० हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेऊन गेले होते. या दोन्ही घटनेनंतर व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये घबराटीचे व भितीचे वातावरण निर्माण झाल्याने आमदार संग्राम जगताप यांनी ‌ अहमदनगर एसपी राकेश ओला यांना गुन्हे उघडकिस न आल्यास पोलीस प्रशासनाविरुध्द उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्याने पोलीस दलासमोर गुन्हे उघडकिस आणण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेची टिम नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणण्याबाबत आदेशित केले होते.
एलसीबी टिम’ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना एलसीबी पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली की, गुन्हे हे आरोपी विठ्ठल घोडके व सचिन घोडके (रा. घोसपुरी, ता. नगर) यांनी केला आहे. ते गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम घेऊन स्प्लेंडर दुचाकीवर बाहेरगांवी जाणार आहेत. तसेच अहमदनगर शहरात येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती पोनि श्री.आहेर यांनी एलसीबी टिम’ला देऊन तात्काळ रवाना केले. एलसीबी टिम’ने हॉटेल सोनाली, नगर दौंड रोड येथे सापळा लावून थांबलेले असताना दोन संशयीत इसम स्प्लेंडर दुचाकीवर येताना दिसले. पोलिसांची खात्री होताच त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा करताच ते पोलीसांना पाहून पळून जाऊ लागले. एलसीबी टिम’ने त्यांचा पाठलाग करुन दोन्हीही संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांना पोलीस टिमची ओळख सांगून त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे विठ्ठल संजय घोडके व सचिन सुभाष घोडके ( दोन्ही रा. घोसपुरी, ता. नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत १ लाख ६० हजार रुपये रोख रक्कम मिळून आली, त्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांना विश्वासात घेऊन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी दि.८/१/२०२४ रोजी दिल्लीगेट येथील ऑफिसमधील रोख रक्कम तसेच दिवाळीचे काळात अहमदनगर शहरातील व्यापा-याचे गल्ल्यातून व एका इसमाचे गाडीचे हॉडेलला लावलेली पैशाची बॅग चोरी केलेली रक्कम असल्याबाबत कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपींकडे अधिक चौकशी करता त्यांनी काही रक्कम घरात ठेवली असल्याचे सांगितल्याने आरोपी विठ्ठल घोडके यांच्या घरातून ४० हजार व सचिन घोडके याचे घरातून १० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोठे चोरी केली आहे, याबाबत विचारपुस केली असता आरोपींनी दिवाळीचे कालावधीत चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता ३ गुन्हे दाखल होती, ही तिन्हीही गुन्हे उघडकिस आले आहेत.
ताब्यातील दोन्हीही आरोपींना अटक करून २ लाख १० हजार रोख रक्कम व ५० हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर दुचाकी असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!