.विजया (धसई शाखा) बँकेचा शेतक-यांना मनस्ताप … शेतक-याचा ऊद्रेक ! …खाते बंद करण्याचा दिला ईशारा

.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन  नेटवर्क

मुरबाड –  भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी  यांनी देशाच्या शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान सम्मान निधी योजनेचे वार्षिक सहा हजार रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याचे निर्देश दिल्याने सर्व पात्र शेतकरी याचा लाभ घेत आहेत. परंतु मुरबाड तालुक्यातील धसई येथे विजया बँक ही नँशनॉलाईज नसल्याने बँक ऑफ बडोदामध्ये अर्ध विलनिकर झाल्यामुळे सर्व शेतकरी वर्गाने या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विजया बँकेत असलेल्या बँकेतील खात्यावर आवेदन पत्र भरले होते.परंतु अर्ध विलनीकरणामुळे आगोदर दिलेले बँक खाते बदलले असल्या कारणाने धसई व परिसरातील सुमारे  पाच हजारच्यावर शेतकऱ्यांना ह्या दोन्हीही बँकेतील व्यवस्थेच्या घोडचुकीमुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभा पासून वंचित राहावे लागणार नाही,   यासाठी  प्रकरणाची दखल घेत  ठाणे जिल्हा परिषदचे सदस्य सुभाष (अप्पा) घरत यांनी विजया बँक शाखा – धसई येथे भेट घेऊन  धसई शाखा बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा केली.
  मुरबाड तहसीलदार यांच्याशी फोनवर चर्चा करून सदर प्रकरणाचे गांभिर्य लक्षात आणून हे प्रकरण तात्काळ निकाली काढून लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व रक्कम त्वरित त्यांच्या नवीन खात्यात वर्ग करून द्यावी,  अन्यथा नाईलाजाने विजया बँक धसई शाखेत असणारी सर्व खाती बंद करून दुसऱ्या बँकेत वर्ग केली जातील याची आपल्या शाखेने व प्रशासनाने नोंद घ्यावी, असा  ईशारा बँक मॅनेजर यांस देण्यात आला आहे. प्रकरणाची लवकरात लवकर योग्ये दखल घेतली गेली नाही तर विजया बँक धसई येथे सर्व शेतकरी घेऊन उग्र आंदोलन करण्यात येईल. विजया बॅकेस टाळे ठोकले जाईल असे सांगण्यात आले.                                                 यावेळी निवेदन देत असताना धसई सहकार सोसायटीचे चेअरमन प्रकाश पवार, शक्ती केंद्रप्रमुख   विजय सुरोशे, सदानंद शेलार, खोपिवली उपसरपंच लक्ष्मण धुमाळ, करमाड सरपंच, मधुकर पारधी भाजप युवा सरचिटणीस मुरबाड तालुका गणेश भोंडविले, धनाजी भांडे, संतोष घोलप, सुरज वाघ, मनोहर भोईर हे उपस्थित होते.

संकलन : बाळासाहेब भालेराव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!