लोक सत्ता संघर्षच्यावतीने विविध क्षेत्रातील कार्य करणार्‍या व्यक्तीमत्त्वांचा 13 सप्टेंबर रोजी राज्य स्तरावरील गौरव सोहळा

लोक सत्ता संघर्षच्यावतीने विविध क्षेत्रातील कार्य करणार्‍या व्यक्तीमत्त्वांचा 13 सप्टेंबर रोजी राज्य स्तरावरील गौरव सोहळा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः वैभवशाली इतिहासासोबतच देदीप्यमान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला पाठबळ देणे, पाठीवर कौतुकाची थाप देणे, हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 12 वर्षांपासून लोक सत्ता संघर्ष ही संस्था आपले कर्तव्य समजून अशा मान्यवरांना पुरस्कारुपी सन्मान देऊन पार आलेले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन ,कला अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा ’लोक सत्ता संघर्ष’ या पुरस्काराने गौरव करण्यात येतो.महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असा नावलौकिक मिळवलेल्या, लोक सत्ता संघर्ष’ पुरस्कारां’चा या वर्षीचा भव्य सोहळा शनिवार दि.13सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11ते 2 या वेळेत,माऊली संकुल झोपडी कँन्टीन येथे होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे.राज्य पतसंस्था फेडरेशनचे संदीप माळी,सहकार क्षेत्रातील डॉक्टरेट डॉ. मनोज कुमार, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अलमुद्दीन वाहीद,तसेच राजकीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तरी या पुरस्कारासाठी कोणाला प्रस्ताव पाठवायचा असेल तर त्यांनी 8 सप्टेंबर सायंकाळ पर्यंत पाठवू शकतो. यासाठी 9527277739,7218807588 या क्रमांकावर संपर्क साधा असे अवहान पुरस्कार समिती कडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!